Saturday, 21 November 2020

आदित्य ह्रिदय स्तोत्र

   विनियोग

ॐ अस्य आदित्यह्रदय स्तोत्रस्य अगस्त्यऋषि: अनुष्टुप्छन्दः आदित्यह्रदयभूतो

भगवान् ब्रह्मा देवता निरस्ताशेषविघ्नतया ब्रह्माविद्यासिद्धौ सर्वत्र जयसिद्धौ च विनियोगः

पूर्व पिठिता :- 

ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम्‌ । रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम्‌ ॥1॥

दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम्‌ । उपगम्याब्रवीद् राममगस्त्यो भगवांस्तदा ॥2॥

राम राम महाबाहो श्रृणु गुह्मं सनातनम्‌ । येन सर्वानरीन्‌ वत्स समरे विजयिष्यसे ॥3॥

आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम्‌ । जयावहं जपं नित्यमक्षयं परमं शिवम्‌ ॥4॥

सर्वमंगलमागल्यं सर्वपापप्रणाशनम्‌ । चिन्ताशोकप्रशमनमायुर्वर्धनमुत्तमम्‌ ॥5॥

            मूल -स्तोत्र 

रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतम्‌ । पुजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम्‌ ॥6॥

सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मिभावन: । एष देवासुरगणांल्लोकान्‌ पाति गभस्तिभि: ॥7॥

एष ब्रह्मा च विष्णुश्च शिव: स्कन्द: प्रजापति: । महेन्द्रो धनद: कालो यम: सोमो ह्यापां पतिः ॥8॥

पितरो वसव: साध्या अश्विनौ मरुतो मनु: । वायुर्वहिन: प्रजा प्राण ऋतुकर्ता प्रभाकर: ॥9॥

आदित्य:     सविता सूर्य: खग: पूषा गभस्तिमान्‌ । सुवर्णसदृशो भानुर्हिरण्यरेता दिवाकर: ॥10॥

हरिदश्व:       सहस्त्रार्चि: सप्तसप्तिर्मरीचिमान्‌ । तिमिरोन्मथन: शम्भुस्त्वष्टा मार्तण्डकोंऽशुमान्‌ ॥11॥

हिरण्यगर्भ: शिशिरस्तपनोऽहस्करो रवि: । अग्निगर्भोऽदिते: पुत्रः शंखः शिशिरनाशन: ॥12॥

व्योमनाथस्तमोभेदी ऋग्यजु:सामपारग: । घनवृष्टिरपां मित्रो विन्ध्यवीथीप्लवंगमः ॥13॥

आतपी मण्डली मृत्यु: पिगंल: सर्वतापन:। कविर्विश्वो महातेजा: रक्त:सर्वभवोद् भव: ॥14॥

नक्षत्रग्रहताराणामधिपो विश्वभावन: । तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्‌ नमोऽस्तु ते ॥15॥

नम: पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नम: । ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नम: ॥16॥

जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नम: । नमो नम: सहस्त्रांशो आदित्याय नमो नम: ॥17॥

नम उग्राय वीराय सारंगाय नमो नम: । नम: पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तु ते ॥18॥

ब्रह्मेशानाच्युतेशाय सुरायादित्यवर्चसे । भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नम: ॥19॥

तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने । कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नम: ॥20॥

तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे । नमस्तमोऽभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे ॥21॥

नाशयत्येष वै भूतं तमेष सृजति प्रभु: । पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभि: ॥22॥

एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठित: । एष चैवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणाम्‌ ॥23॥

देवाश्च क्रतवश्चैव क्रतुनां फलमेव च । यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमं प्रभु: ॥24॥

एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च । कीर्तयन्‌ पुरुष: कश्चिन्नावसीदति राघव ॥25॥

पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगप्ततिम्‌ । एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि ॥26॥

अस्मिन्‌ क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि । एवमुक्ता ततोऽगस्त्यो जगाम स यथागतम्‌ ॥27॥

एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोकोऽभवत्‌ तदा ॥ धारयामास सुप्रीतो राघव प्रयतात्मवान्‌ ॥28॥

आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान्‌ । त्रिराचम्य शूचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्‌ ॥29॥

रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागतम्‌ । सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधेऽभवत्‌ ॥30॥

अथ रविरवदन्निरीक्ष्य रामं मुदितमना: परमं प्रहृष्यमाण: ।

निशिचरपतिसंक्षयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति ॥31॥

                           ।।सम्पूर्ण ।।


Tuesday, 31 December 2019

2019 समरणातले वर्ष


जाताना तुज पाहुन 
झाले उदास मन हे काहीसे 




Thursday, 5 September 2019

माझ्या आयुष्यातली बेस्ट शिक्षिका :)

आयुष्याच्या त्या टप्यात ,
                      बालपणीच्या एका कप्यात .             होती एक प्रेमळ आठवण , 
 थोडीशी होती कडक पण मायेची ती साठवण . 
                      शिक्षिका एक आठवणीतली ,
                        गुरू माझी ती बालपणातली .    आठवते ते बालपण , 
   आणी बालपणी ची ती शिकवणी . 
                    आठवतं माझं अभ्यास चुकवन ,  
                      आणि धोपटून तुझं ते शिकवणं .   तुज्या गोष्टी आहेत अनंत ,
        स्मरणात नक्कीच राहणार त्या नितांत . 
                 मग असो मी काढलेली खोडी ,
      किव्वा तु सोडवून घेतलेली गणिताची कोडी .
                 सर्वकाहीच आहे लक्षात  ,
 अजुनही वाट तात ते खरे खुरे भास ,
 कारण आठवणी त्या  होत्याच अगदी खास . 
       मग असो  करून तु घेतलेली 
             तयारी परीक्षेची ,
                     किव्वा असो  तु दिलेली  ,
                         न्याहरी त्या तुपपोळीची. 
 जेव्हा जेव्हा संकट वाटले दाट ,
   अचानक दिसली तुझी योग्य दाखवलेली वाट.
         आठवणी तुज्या आजवर आहे मनात  ,
            कारण विसरले नाही तुला मी क्षणात .
............................................................................
                             आज शिक्षक दिन ,
         सर्वांना शिक्षक दीना च्या खुप शुभेच्छा . आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुनी ना कुणी गुरू हा असतोच . आणि गुरू म्हणजे तो फक्त शिक्षकच असला पाहिजे असा नाही . जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो , आयुष्यात काहीतरी चांगली शिकवणूक देऊन जातो तो गुरू , ज्याच्यामुळ आपल्याला आयुष्यात काय करायचं ही दिशा मिळते , प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या गुरूच्या शिकवणुकीतून सहज सोडवता जेव्हा येते अशी व्यक्ती म्हणजे आपला गुरू .  
               माझ्या आयुष्यातही
अशीच एक गुरू होती .ती माझी उत्तम शिक्षिका ही होती , आणि  "उत्तम मार्गदर्शक"! . तिचं माझ्या आयुष्यातील स्थान हे कुणीही नाही घेऊ शकत , तिची जागा ही स्वतंत्र आहे . कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची एक वेगळी खास गोष्ट ही नक्की असतेच , तसेच तिच्याबद्दल ही आहे . तिच्यासारखी शिक्षिका माज्या आयुष्यात दुसरी नाही होऊ शकली , म्हणून ती माझ्या साठी बेस्ट होती  आणि राहील.ती म्हणजे माझी स्वाती मावशी जीचा रोल माझ्या आयुष्यात लहानपणापासून होता , तो एका उत्तम शिक्षिकेचा आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या छान 
शिक्षिका आणि सोबतच माझ्या मावशीचा देखील होता .   म्हणून तर मी बोलले की ,  तीच स्थान म्हणजे  हे माझ्या आयुष्यात अगदी स्वतंत्र आहे  . कारण  तिच्या अश्या एक दोन गोष्टी नाहीत की ज्या या ब्लॉग मध्ये सांगता येतील , खूप काही आहे त्याच कनेक्शन माझ्या बालपणाशी येतं ☺. आणि बालपण हे तर  खूप मोठे असते कारण त्यात असंख्य गोष्टी असतात  ज्या आपल्याला अगदी नवीन असतात ,  पहिल्यांदा शिकण्यासाठी . ज्या आपल्याला आई वडिलांनकडून किव्वा कुना फै मेली मेंबर कडन माहीत होतात , मग कुणी आपला अभ्यास घेत असतो तर कुणी आपल्याला खेळात तयार करत असत तर कुणी आपल्या छंदा नुसार आपल्याला गाणी , नृत्य यात पारंगत करायला मदत करत असत . ते म्हणजे आपले जवळपास चे लोक .  कुणीही असु शकते आई बाबा , मावशी , ताई , आजी .. अनेक  आहेत .☺
आणी तसच माझ्या आयुष्यात ही माझ्या अभ्यास घेण्यापासून तर माझे प्रत्येक छंद  ( चित्रकला,ओरिगामी सारखे ) जिनी जोपासायला मला नेहमी  मदत केली आणि वेळोवेळी माझं प्रोत्साहन  वाढऊन मला अभ्यासामधे नंबर एक  तर अनेक चांगल्या गोष्टीमध्ये आत्मविश्वासू जिने बनवलं . 
अशी एक व्यक्ती माझ्या ही आयुष्यात अगदी लहानपणापासून होती . जिने मला अभ्यासात तयार केलं , त्याचबरोबर भरपुर चांगलं काही शिकवलं , अभ्यासातली कुठलीही अवघड गोष्ट सोपी करून शिकवण आणि त्याची गोडी लावून त्यात अगदी पक्कच करून सोडणं ही त्या शिक्षिकेची ग्रेट जिद्द होती , ती जिद्द तीने मलाही लावली लहानपनी  . ती व्यक्ती म्हणजे माझ्या आजच्या ब्लॉग ची स्टार म्हणजेच माझी बेस्ट शिक्षिका 😊 आणि माझी मावशीही .जिचा उल्लेख मी वर माझ्या कवितेतही केला आहे , ती म्हणजे  माझी बालपणाची गुरू माझी" स्वाती मावशी "  जिच्यामुळं मि नंबर वन होते , तिनी बनवलं होत मला नंबर वन 👍 
मला आजही आठवतात ते बालपणातले एक एक दिवस आणि मावशीचा अभ्यास घेतानाचा प्रत्येक धडा आणि छड्या ही 😊 ज्या खाऊन मी माझ्या नावडत्या गणिततही पारंगतत झाली होती . अशा कितीतरी मला प्रत्येकत्येक चांगल्या गोष्टी शिकवण्यामागे किव्वा मला योग्य दिशा दाखवण्यामागे माझी ही बेस्ट शिक्षिका सर्वात अगोदर येते . आणि या माझ्या बेस्ट शिक्षिकेमुळंच माझा स्वतःवर खूप विश्वास असायचा , कारण तिनी मला अभ्यासपासून तर प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये टेन त
जस की मला आजही आठवते  ,
तिची मला फळ आणि भाजीपाला खायला  लावण्याची  चांगली सवय पासुन तर गणितातला  बेरीज-वजाबाकी असो किंवा गुणाकार भागाकार 


सारख्या अभ्यासातील गोष्टी , अश्या प्रत्येक चांगल्या गोष्टी मागे माझ्या या मावशीचा माझ्या आयुष्यात खूप मोठा रोल आहे . म्हणून तर आज शिक्षक दिना ला सर्वात अगोदर तिची च  आठवण झाली .

लहानपणी मला फास्ट फूड खायला खुप आवडायच .चॉकलेट , बिस्कीट आणि भरपुर काही निरनिराळ्या गोष्टी ,कदाचित मावशींनी थोडं दापुन असो किंवा थोडं समजुन असो पण जर हिरव्या पालेभाज्या आपल्या साठी किती महत्वाच्या असतात हे पटवून दिल नसतं तर आजही मी पूर्णपणे फास्टफूड  प्रेमी असते , माज्या लक्षात आहे तिनी मी तिसरी ला असताना सांगितले होते की तुप पोळी खाशील तरच पहिला नंबर राहील , याने ताकद येते आणि लक्षात राहते , निदान पहिला नंबर येण्याच्या आशेने तिचे म्हणणे मला त्यावेळी पटून चांगला आहार हा पहिला लेसन माझी बेस्ट शिक्षिका कडुन मिळाला होता .तो आजही आठवतो जेव्हा मी माझ्या योगा -प्राणायम कडे दुर्लक्ष करते तेव्हा मावशीच्या चांगल्या सवयी आणि ते बालपण आठवल्यावर मला स्वतःला नियम लावायला जड जातच नाही .आपोआप माझं तुटलेल रुटीन बसुन जाते .  कारण मला त्यावेळी माझ्या बेस्ट शिक्षिकेची तालीम आठवते ☺ यातलं एक उदाहरण आहे , जेव्हा माझी तब्येत वाढली होती तेव्हा घरातल्याच काही लोकांनी मला असा फील करवत ल की जसा काय माझं आयुष्य संपलं आता बारीक होणार नाही 😊
पण एक गोष्ट ठरवली तर होऊ शकते हे मला लहानपणी माझ्या बेस्ट शिक्षिकेनेच शिकवले होते म्हणून मी  पुन्हा माझं योग सुरू करून मापात आले ☺कारण आपण काही करू शकत नाही हे मी तिच्याकडून शिकलेच नाही , तिच्याकडच्या असंख्य मोटिव्हेशन  च्या गोष्टी आजही माझ्या जशाच्या तशा लक्षात आहेत 👌
त्यातलली अभ्यासची तर गोष्टच खास होती , आणि सर्वात महत्वाचं म्हणजे

माझ्या मावशीमुळेच मी माझ्या बालपणी शाळेत नंबर वन होते. कारण  मला माझ्या परिक्षेसाठी तयार करणारी मावशी मला आजही लक्षात आहे  . मला आजही आठवत  गणिताची शिकवणी सुरू असताना  लक्षात नाही आले तर 
एक  पासुन तर तर शंभर पर्यंत  दहा वेळा म्हणायला लागायचं 😊  आणि यामुळे च माझा शाळेत पहिला नंबर असायचा  . मावशीचा अभ्यासाच्या बाबतीतला कडकपणाच मला  प्रत्येक अवघड वाटणारी गोष्ट पक्की करूनच सोडत होता .म्हणून तीच लग्न होई पर्यंत माझा पहिला नंबर कधीच खाली गेला नाही . मात्र जसा तीच लग्न झालं माझा  आणि गणिताचा  जो छत्तीसचा आकडा बसला तो आजवर आहे , अभ्यासात सूट घ्यायची सवय पडली होती मला मावशीच लग्न झाल्यावर .
आणि यानंतर माझ्या आयुष्यात सर्वात मोठा जो टर्निंग पॉईंट आला त्याने माझ्या आयुष्यातला माझा आत्मविश्वास च डळमळून टाकला . प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी किव्वा कित्येकदा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतच असतात . त्यावेळी आपल्या जवळचे लोक आपल्याला समजून घेतात . आपल्या ला आत्मविश्वास देतात आणि आपल्याला खचुन न देता आपल्याला योग्य मार्ग दाखून आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सतत करत असतात .प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी चांगला व्यक्ती असतोच . जो आपल्याला त्या वेळी साथ देतो ज्यावेळी आपण आत्मविश्वास गमावलेला असतो किव्वा आयुष्यात एखाद्या गोष्टी मूळ खचून गेलेलो असतो .
मात्र माझ्या जवळ अशी कुठलीही व्यक्ती नव्हती त्या वेळी ,  ज्या वेळेला मी माझा पूर्ण आत्मविश्वास गमावून बसले होते . त्यावेळी माझ्या आयुष्यात मला फक्त आणि फक्त डीमोटीवेट  करणारे लोक भेटले , ज्यांनी माझं टेन्शन कमी करण्याऐवजी  निगेटिव्ह बोलून बोलून फक्त वाढवलं आणि  हे सर्व लोक घरातलेच होते ( रिलेटिव्ह ) . हो काही असतात अशी नासकी फळे जी प्रत्येकाच्या आयुष्यात कुठं ना कुठं भेटतात , फक्त  मला ही सडकी फळं नातेवाईकांत भेटली एवढंच .  . मला एवढंच सांगायचं होत की ,   आणि वाईट लोक मला जेव्हा डी मोटिव्हेट करून जायचे , आणि इनडाईरेक्टली मला ही  जाणून बुजून जाणीव करून देत होते की मी मोठी  स्वप्न पाहणं योग्य नाही .  तेव्हा मला ते खटकायच जेव्हा ते माझ्या वाटण्यावर प्रश्नचिन्ह करायचे . आणि  लहानपणापासून प्रत्येकजण काही ना काही बनायचं हे त्याच्या मनाने ठरवत असतो  .
तसा मीही ठरवलं होतं  मला एअर होस्टेस बनायचं होत कारण माझी आवड लागली होती त्यात मनापासून , कारण मनाला  वाटू शकतं कांही पण , कुुठलंही स्ववप्न पाहू शकतो प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार . आणि हे एवढ्या 
 प्रसिद्धी मधल्या प्रोफेशन ला एक बिनडोक माणुस विमानतला नोकर म्हणला तर  माझी दुसरी मावशी "हे कुणी तुझ्या डोक्यात घातलं , अस बोलुन माझ्या मनात हे प्रश्नचिन्ह निर्माण केले   की मी ही इच्छा करून काहीतरी घोर अपराध केला की काय ! ☺ हे स्वप्न असाच माझं  चुरगळल काही बऱ्याच लोकांनि . यावर मी मोठा पूर्ण ब्लॉग बनवलं दुसरा ... तर यानंतर माझं आयुष्य मि एवढं सिरियसली नाही घेतलं , माझ्या मनाविरुद्ध  अनेक गोष्टी घडल्या आणि काहींममूळ मी भरपुर ताणही करून घेतला स्वतःला , कारण यावेळी माझ्या आसपास सर्व नकारात्मक विचाराचे लोक होते .   पण यापलीकडे काही चांगली व्यक्ती पण होते जे मला नेहमी समजुन घेत होते . 
               माझ्या आयुष्यात सर्वात जवळचे  माझे आज्जी आजोबा .  यांच्या सानिध्यात राहुन माझा सेल्फ कॉन्फिडन्स पुन्हा आला , कारण माझ्या आजोबांनी मला कधीही हरन शिकवलं नाही , ते स्वतःही तसेच कणखर आणि स्वाभिमानी आहेत , कधी कुणावर अवलंबून राहून , उपकार घेणे हे त्यांच्या डिक्शनरीत बसत नाही , आणि मी लहानपणापासून आजी आजोबांकडे असण्यामूळ हे गुण माझ्यातही आलेत . ते नेहमी मला सकारात्मक गोष्टी माझ्या लहानपणापासून  मला सांगत आले शिकवत आले .ह आणी  हेच  माझ्या आयुष्यात असलेले पॉजीटिव्ह  लोक आहेत.
  .ज्यांच्या असण्याने मि माझ्या  आयुष्याच्या  येणाऱ्या अवघड वळणावर स्वतःला  खचून नाही दिले . 
तर दुसरीकडे काही लोक ही आमच्या रिलेटिव्हज  मध्ये होती जी स्वार्थी आणि निगेटिव्ह आणि अतिशय घाण प्रवृत्ती ची थोडक्यात गुडघ्यात मेंदू असणारे लोक जे स्वतःही खुश राहत नाहीत आणि दुसऱ्या ला ही जगु देत नाही आणि एखाद्याने मोठी स्वप्न पहिली की जळकी प्रवृत्ती ठेवणारे लोक जे नेहमी दुसऱ्याच चांगलं होऊच द्यायचं नाही अशी प्रतिज्ञा करूनच या जगात भार द्यायला येतात , अश्यातलेच भरपूर नासकी अंडी आमच्या रिलेटिव्हज  मध्ये अनेक होती , जी प्रत्येकदा माझ्या वाईट करण्यावर होती , माझं चांगल काम कसे बिघडेल या प्रयत्नात असायची , मला याचा बराच काळ खूप त्रासही झाला पण जसा घरातला कचरा आपण दुर  करतो ना तसच  ते ही मी आईष्यातून दूर केली , जी मला  माझ्या मोठ्या स्वप्नांपासून दूर करत होती . त्यांच्यामूळ  माझं बरच नुकसान झालं . पण  कालांतराने माझा त्यांनी चुकवलेला मार्ग मला पुन्हा सापडला आणि माझी तुटलेली हिम्मत मला पुन्हा मिळाली आणि यात सर्वात अगोदर मि माझ्या साई बाबां ना थँक्स बोलली , कारण मी त्यांना सर्वात जास्त मानते आणि दुसरं म्हणजे माझ्या आयुष्यात असणाऱ्या पॉजिटीव्ह लोक जी ना कधी माझ्या मोठ्या स्वप्नांना बघून कधी असा नाही बोलली का हे तू नाही करू शकत , लहानपणापासून माझ्या चांगल्या गोष्टींचं कौतुक तर केलंच पण मला त्यावेळी दिलेलं त्यांचं प्रोत्साहन मला आज अशा वेळी कामी आलं ज्यावेळी मला त्याची खूप गरज होती , जेव्हा निगेटिव्ह लोकांनी माझा आत्मविश्वस गमावला होता ,  अश्या वेळी लहानपणापासून तर आजवर जी लोक माझ्या आयुष्यात बेस्ट आयडॉल म्हणून होती , त्यांच्यामु मला माझे हरवलेले स्वप्न पुन्हा मिळाली , जे मि मूर्ख लोकांचं ऐकून सोडून दिली होती आणि हार मानली होती .
पन ते असत ना कुणी आपल्या वर ठेवलेला विश्वास  आपण दिलेलं प्रोत्साहन हे इतकं मजबूत असत ना कितीही निगेटिव्ह लोकं भुंकली तरी ते निगेटिव्ह विचाराची कुत्री आपला चावा नाही घेऊ शकत . फक्त त्यांचं भुंकन फक्त ऐकू येत , आणि ते भुंकन आपलं काहीच बिगडाऊ शकत नाही हे मला आज समजलं माझ्या आयुष्यात  ☺कारण माझ्या कडेही तो दृढ विश्वास ठेवणारे लोक होती आणि तेच भरमसाठ  प्रोत्साहन देणारी लोक माझ्याकडं लहानपणी होती , ज्यांची बोलणी आणि त्यांची शिकवणी माझ्या मेमरी फोल्डर मध्ये अशी फिट झालीये जी कुणाच्याही निगेटिव्ह बोलण्याने किव्वा मला मार्गहीन करनार्यांच्यामूळ डिलीट होऊ शकत नाही . अशी ग्रेट लोक म्हणजे माझे आज्जी आजोबा आणि माझी आजच्या ब्लॉग ची बेस्ट शिक्षिका म्हणचे माझी स्वाती मावशी 😊 हे तीन लोक माझ्या आयुष्यात होती आणि आहेत याचा मला अभिमान आहे कारण ती माझ्यासाठी खुप महत्वाचे आहेत , या प्रत्येकाच माझ्या आयुष्यात काही काही म्हहत्वाचा रोल राहिला आहे आणि ज्यांच्या फक्त शिवणुकीतली काही वाक्य आणि शिकवण जी होती , ती फक्त आठवता क्षणी माझ बिघडलेल आयुष्य सुधारू शकत आणि माझा गेलेला कॉन्फिडन्स पुन्हा आनू शकत  अशी  ती माझ्या आयुष्यात असणारी पॉसिटीव्ह ऍंजल्स आहेत . आणि कायम राहतील 😊👌
आणि त्यांची  अमझिंग गोष्ट माहीत का .?  ती म्हणजे अशी की ,
ती माझ्यापासून लांब जरी राहत असतील तरी त्यांचे विचार माझ्या अंतर्मनातल्या फोल्डर मध्ये परमनंट सेव्हड आहेत जे मि अडचणीत असता क्षणी वा खचून जाता क्षणी पॉवर पफ गर्ल्स सारखे येतात आणि माझ्या प्रत्येक प्रश्नां ना सोडवतात . म्हणून आज माझी लाईफ रिलॅक्स झाली आहे , कारण मि माझी हरवलेली खुशी किव्वा स्वप्न जे काही होत जे  ज्यात मी खुश होती  ते मला पुन्हा मिळाले आहेत . फक्त माझ्या आयुष्यात ल्या या तीन लोकांमुळेच
 ☺☺☺ थँक्स अ लॉट मावशी  दादा आणि अक्का (माझे आजी आजोबा ) 😊 आणि शिक्षक दिनाच्या खुप शुभेच्छा मावशी💐💐💐
  तु माझ्या आयुष्यातली बेस्ट शिक्षिका होतीस आणि आहे आणि राहशील . आणि तुज्या शिकणुकीतले धडे मला नेहमी तोंडपाठ राहतील ☺ज्यामुळे मि स्वतःवर नेहमी विश्वास ठेऊ शकेल , मला कितीही  निगेटिव्ह बोलणारी लोक भेटली तरी मि  माझ्या कॉन्फिडन्स ला अधिसरखे तडे जाऊ देणार नाही , ना माझे स्वप्न सोडेल . मोठे स्वप्न आपण स्वतावरच्या विश्वासाने पूर्ण करू शकतो हे तूच शिकवलं होते  ज्याचा आज मला माझ्या आयुष्यात माझा गेलेला सेल्फ कॉन्फिडन्स परत मिळवायला खूप मदत झाली 😊  माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षिका बनल्याबद्दल धन्यवाद . 👍  आज या
शिक्षक दिनावर मि तुला एवढंच म्हणेल  आणि माझा एकच मेसेज तुला असेल तो हा 💌
                         👇
        🏆 You are the best motivator of my life and a positive person who taught me to trust myself ✊ 
& i will never forget it all 🙆


                😊 ........ Forever ....... 😃
................................................................
......................................................................... 
                 ...........................................
          
              😊  काय फ्रेंड्स  ☺कसा वाटला आजचा  ब्लॉग ?  जरा मोठा झाला , एकदम माझ्या स्विटू ची स्लॅम बुक वाल्या ब्लॉग सारखा , हो कारण हा ब्लॉग माझ्या बालपणातल्या आठवणींवर होता म्हणुन त्या दिवसात हरवले बोलता बोलता ☺ कारण बालपणातल्या गोष्टी आणि खोलवर मनात असलेल्या आठवणी आणि फेवरेट नेत्यांवरच्या  भावना या छोट्या पेज वर मावत नाहीत 😊 खर आहे ना . ? 


                      बाय बाय  डियर फ्रेंड्स 
                  पुन्हा  भेटु पुढच्या ब्लॉग वर ☺
                       ब्लॉग आवडला तर ,
                 नक्की सांगा आणि फॉलो करा  
                                  👍

Thursday, 8 August 2019

जा रे जा रे पावसा !


^^:^^:^^^^:^^:^^

       भल्या पहाटे आली लहर ,

                 स्वप्नांनी केला भारी कहर  .
                         स्मरणी दाटला वसंत रूतुचा बहर  .
               आठवली ती रम्य हिरवळ ,
                      अन भिजण्यासाठीची आतुर तारांबळ .

 म्हणूनच आली वाटुन हळहळ आज काहीशी 

    अन आतुरताही  झाली का जणु नाहीशी. 
              कारण दिसेना तो बहर ,
                    अन दिसेना ती हिरवळ .
     कारण सुखाच्या त्या सरींवर घालुनीया झडप,
                झाली आहे आजकाल अगदीच ती गडप .

     जणु का आजकाल बदलले ऋतूंचे स्वरूप,

           अन दिसेनासे झाले मोहक सरींचे हुरूप      
               झाला दडपुनिया तो वसंत ऋतू चा नूर ,
          अन पावसाची ती मजाच गेली जणुं दूर .

    कारण हरवलाय तो पावसाचा थाट , 

                      दुरावली ती सौम्य सरींची मजा , 
                अन हरवली आनंददायी पावसाची  ती वाट .

...........................................................................                       .............................
              .............................................

            😊☺☺☺  पाऊस ☺☺☺😊

      पाऊस . . . ! म्हणलं की चेहऱ्यावर येते ती खूप मोठी स्माईल ☺ कारण पाऊस हे नेहमी माझं जाम आवडणार कुतूहलच राहीलय , मात्र 

" पाऊस " खर तर हा शब्द घेता  क्षणी डोळ्यांत  अगदी त्या पावसाच्या सुरेख सरींनी भिजणारी ती हिरवळ , अन पाऊस येऊन गेल्यानंतरचा तो गार वाऱ्याचा स्पर्श आणी चहूकडे नितळ परिसर जणु  सर्वकाही धुवून नवे कोरे झाल्यासारखे अशे स्पष्ट मोहक रम्य वातावरण ,☺ हे सर्व फक्त पाऊस या एका शब्दातच आधी आठवायचं.
मात्र आता त्या पावसाच्या छान वाटणाऱ्या आठवणी  जणु दिसेना झाल्या आहेत . 😢
आज पहाटे पहाटे पावसाचं स्वप्नं पडलं . त्यात जुन्या पावसाच्या दिवसाची आठवण झाली . त्यात सुखद असा पाऊस होता अन पाऊस पडून गेल्यावरची ती हिरवळ  अन ती फुलांची बहरलेली बाग आणी त्यावर बागडणारी रंग बिरंगी फुलपाखरं ही होती . अस ते डोळे दिपवून टाकणार दृश्य बघुन अगदी बालपण च डोळ्यासमोर उभं राहिलं .
आनी जेव्हा स्वप्नलोकातून बाहेर आले तेव्हा वाटलं की ,
का श ! ते स्वप्न तुटलं नसते तर ,☺ ? कारण खूपच मनाला तृप्त करून टाकणार दृश्य होत ते आणि विशेष म्हणजे हे स्वप्न मला मला माझ्या बालपणा च्या पावसात घेऊन गेल. ज्यात स्वप्नाप्रमाणेच खरा खुरा पाऊस होता आणि मी अनुभवलेलं ते बागेतील  फुलपाखरांचं बागडन आणी ते पावसानी फुलांचं बहरन  . या सुरेख वातावरणाचा अस्वाद तर बालपणी घेतला असावा , कारण आजकाल पावसाचं स्वरूप च बदलून गेले आहे . जो मी कवितेतही उल्लेख केला आहे . म्हणून तर मी कवितेच्या सुरवातीला स्वप्नातला सुरेख पाऊस आणि स्वप्न तुटल्यावर जो आठवला तो म्हणजे आजचा  बदलत चाललेला पाऊस या दोन्हींचा उल्लेख केला आहे .  आणी अगदी मी हा ब्लॉग लिहिला , तेव्हा रात्रीपासून पाऊस चालूच होता . पण तरीही मला माज्या स्वप्नी दिसलेला आपल्या बालपणीच्या पावसाचा उल्लेख करावा वाटला . कारण तो मला आजच्या पावसाच्या तुलनेत खूपच खास वाटला .
कारण आजकाल माजी पावसाची मजा जणु गडप झाली आहे . रोज सकाळी उठल्यावर टी व्ही वर पावसाने किती लोक बेघर झाली , कुणी वीज पडुन गेलं तर कुनी खड्ड्यात पडलं तर कुणाची घर पडली तर कुनाच्या गावात भरमसाठ पूल आला आहे , आणि म्हतारी माणस बोटींनी सुखरूप ठिकाणी पोहोचवले जाताय . या अशा सर्व बातम्या रोज सकाळी कानावर पडताय , या घटनांनी पाऊस म्हणजे पूर , वीज हानी - जीवितहानी , प्राणी , माणसे यांच्या यातना च डोळ्यासमोर येऊ लागल्या आहेत. आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एक भयाण बातमी कानावर पडली की, चार गायी पुरात वाहून गेल्या , ते टी व्ही वरच दृश्य डोळ्यासमोरून हलत नव्हतं . मन भरूनआलं अगदी , आता त्या बिचाऱ्या गायीची काय चूक होती ? या नैसर्गिक आपत्ती ने त्या गायींना मारलं . जीव खूप कासावीस होत आहे असल्या बातम्या बघुन . म्हणुन पावसात ती बालपणीची सौम्य वाटणारी मजा ते भिजणं जणु हरवलं आहे आज , पावसाचा मारा रोज काहीतरी नुकसान करून गेलेल्या बातम्या झळकत आहेत . अस पाहुन मला  माजा आवडता पाऊस अगदी नकोसा झाला होता .
आणि यात ते पावसाचं गाण आठवलं

 " ये रे ये रे पावसा " पण आज ना ती उत्सुकता वाटते ना ती पावसाची हौस , जेव्हा जेव्हा या पावसामुळे गेलेले बळी , पुरामुळे बेघर झालेले लोक , सैरावैरा धावणारे मुके प्राणी या चोवीस तास टी व्ही वर झळकत असणाऱ्या बातम्या जेव्हा कानावर पडताय ना तेव्हापासून हे पावसाचं गाणं पण नकोसे झाले आहे , मन सारख म्हणत आहे " जा रे जा रे पावसा " ,

               "  प्लिज , जा रे बाबा पावसा " !  

पण मात्र पुन्हा मनात विचार आले पाऊस नाही आला तर बिचाऱ्या शेतकरी लोकांच्या पिकांच काय .?  पिक म्हणजे शेतकऱ्यांच सर्वस्व , आणि त्यासाठी तर पाऊस हा हवाच आहे . तो ही भरपूर , पुरेसा . मन दुहेरी विचारांचा झोका खेळत च होत . शेवटी मनापासून  देवाला प्रार्थना करावंसं वाटली . सर्व त्याला सांगावस वाटलं ,  अखेर या सर्व विचारांवर माज मन देवाला एकच बोललं की , 

" प्लिज देवा , पाऊस हा भरमसाट च होऊदे अगदी " पण त्यात कुठलीही जीवितहानी नको होऊ देऊस . मुक्या जनावरांना या नैसर्गिक आपत्ती चा शिकार नको होऊ देऊ , सर्व प्राण्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळूदे , पावसात बिचाऱ्या प्राण्यांना खायला कुना ना कुणाकडून भेटुदे , मांजरीना दूध भेटुदे . कुणीही पावसाने बेघर नको होऊ देऊ , 

"कारण प्रत्येक च माणूस इतका श्रीमंत नसतो " की , पावसाने घर कोसळले म्हणून लगेच दुसर घर उभं करू शकेल . ! कारण आपलं छोटस घरसुद्धा कित्येक जनांनी रात्र दिवस एक करून मेहनतीच्या एक एक पैशांनी बनवलेलं असत .

या पावसाने कुणाला फरक नसलं पडत तो  फक्त सेलिब्रेटी लोकांना , ते दहा घर घेऊ शकतात , मात्र गरीब लोकांचे घर गेल्यावर प्रचंड  हाल होतात . आणि राहिला प्रश्न प्राण्यांचा तर माज्या मनात हा विचार सारखा सतावत होता की ,  आपण या पावसात जनजीवन तर विस्कळीत झालं पण प्राण्यांचं काय मग . ? कुठं आसरा भेटत असेल त्यांना ? कोणी पावसात त्यांना खायला देत असेल की नाही .? 
 आपल्या पाळीव कुत्रा , मांजर याना दूध देतो रोज पोळी टाकतो मात्र जे कुणाच्या घरात नाहीत अशे फिरणारे प्राणी या भयाण पावसात कुठं जात असतील ते बिचारे ? काय खात असतील .? आपण कसे जिभेचे चोचले पुरवतो , पावसात चहा भजी चा आस्वाद घेऊन घरात शांत बसलेले असतो , मग प्राण्यांना पण या पावसात , गार वाऱ्यात किती भूक लागत असेल .?  या अश्या अनेक विचारांनी माझ्या मनात तुफान च उठवल . आणी म्हणून च पहाटे पहाटे पावसच्या त्या सुंदर स्वप्नाच्या आनंदापेक्षा या आजकालच्या पावसाच्या रौद्र स्वरूपाचं च नवल वाटलं , भीती वाटली आणि अनेक विचारांनी मनात वादळ उठवलं . मग जरा मन शांत करून देवाला आठवलं या
विचारांनी अस्ताव्यस्त झालेल्या मनाची समजूत घालायला म्हणून सारख देवाला मनापासून एकच विनंती येत होती  की ,
 "देवा पाऊस हा पुन्हा  बालपणी सारखा होऊदे जसा मी माज्या बालपणी बघितला अनुभवला होता  " तो  सौम्य पाऊस परत दे प्लिज !  ज्यात कुणाचंही नुकसान नाही होणार , शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळेल , लहान मुले पावसाचा आनंद घेऊ शकतील असा विजरहीत पाऊस ,  जनावरे , घरे ही सुखरूप राहोत , असा हा सौम्य निखळ पाऊस तर सर्वानाच आवडेल . असा पाऊस पडला तर खूपच छान होईल असा विचार आणी देवाला प्रार्थना करता करता कधी पुन्हा झोप लागली कळलंच नाही , मात्र हे सर्व विचार , ते पावसाचे स्वप्न हे मनात घोळतच होत .आणि जाग आली ती नेहमीच्या वेळेला म्हणजे सकाळी आठ वाजता ,☺पण मात्र नेहमीसारखी टी व्ही चालू करताना मनात  भीतीदायक पावसाच्या बातम्यांची कुठलीही धास्ती नव्हती . कारण , झोपेत भल्या पहाटेच सर्व घटनांची जवाबदारी देवावर सोपवली होती म्हणून खात्री होती तो नक्की ऐकेल , कारण निस्वार्थ इच्छा देव नक्कीच ऐकतो म्हणून ते स्वप्न आणि देवाला केलेली प्रार्थना हे आठवून चेहऱ्यावर एक  स्मित हास्य आलं आणि  दिवसाची एक  छान सुरुवात झाली ☺☺☺   आणि आता पावसाच गाणे म्हणायचच असेल तर जा रे जा रे पावसा ऐवजी , 
 " पावसा रे पावसा , हळुवार ये रे पावसा ! अस म्हणण्यात काहीच वावग नाहीये ,☺☺☺

                तर मग कसा वाटला ब्लॉग .? 

      पावसाच्या फ़क्त छान छान। आठवणींपेक्षा जरा रियरिटी ची ही जाणीव आजच्या स्वप्नातून झाली . म्हणुन आजचा ब्लॉग जरा मोठा झाला . 

कसा वाटला ब्लॉग हे नक्की कळवा ☺
 भेटुयात पुढच्या ब्लॉग मधे . बाय बाय फुलपाखरानो ☺आपल्या या  "स्वच्छंद  फुलपाखरू"  वर पुन्हा नक्की या ☺ बाय बाय 
☺☺☺
                             ☺☺☺☺



डियर बने फ़ैमेली

एक गोड कुटुंबाचा सुखमय असा प्रवास , लाऊन जातो मना  प्रेमळ नात्यांची आस ! 

रोजच देऊन जाता तुम्ही नवनवे ध्यास . 

     प्रत्येक तुमचे बोल ,

 हे मुळीच नाही वाटत, फक्त इक भास . 

 तुमच्या कुटुंबात जरी असले ,

                 काल्पनिक पात्र .

आम्ही तर मात्र दररोज आहोत ,

                         अप्पांचे छात्र ! 

मग भलेही चढो त्यांचा पारा , 

किव्वा भेटूदेत त्यांचा ओरडयाचा मारा . 

पन निमुटपने ऐकतो त्यांच्या नियमांचे कौल.

कारन असतात  ते भारी अनुभवांचे बोल.

 मग चालो आप्पांच्या शब्दांच्या धारा ,

        किव्वा भेटो त्यांचा ओरडयाचा मारा .

तरीही हवा आम्हाला तो रागाचा तोरा ,

         कारन त्यात फक्त असतो ,

                 त्यांच्या काळजीचा वारा  ! 

म्हनुन तर ऐकतो निमुटपने ,

          त्यांचे नियमांचे कौल  ! 

कारन असतात ते भारी अनुभवाचे बोल . 

अशी ही आगळी वेगळी बने फैमेली ,

           कधीही ना कुठेही पाहीली . 

हसत खेळत शिकवतात तुम्ही 

 जिवनातले धडे .

      सावरतात त्यांना  जो कुनी ,

           ठेस लागुनी पडे . 

सुधा आज्जीची ति  प्रेमळ माया  , 

       ही मनी देऊन जाते ,

           आईची  सुखद छाया  !

आज्जी अन आजोबा असतातच 

 आनंदाचा पिटारा आनी

     सुख शांतीची तिजोरी . 

 त्यांचे खरे खुरे स्वरुप दाखवले  मात्र 

          बने कुटुंबातुन !

 जिव लागला त्यांच्यावर आमच्या 

       या अंतकरना:तुन !

 फिरवला आम्हावर हात मायेचा हळूवार ,          शिकऊन जोड ही नात्यांची घनदाट .

         साकारला तुम्ही  प्रेमाचा नवा नुर , 

                 दाखऊन योग्य ती वाट . 

म्हनुनच ऐकायचा रोज ,

     तुमचा प्रत्येक नविन किस्सा . 

       असेच  बनुन राहायच आम्हा ,

                बने कुटुंबाचा हिसा . 

         अशी ही डीयर फैमेली ,

घेऊन आली सुरेख  नात्यांची जोड .

           देऊन मायेची सावली , 

                  लाऊन गेली मनात प्रेमळ ओढ .

… … … … … … … … … … … … … … … … …
 … … … … … … … … … … … … … … … … …

कशी वाटली कविता . ? हे माझ बने कुटुंबावर असनार प्रेम मि कविता च्या माध्यमातुन व्यक्त करन्याचा प्रयत्न केला आहे . खर तर या  कवितेत मि  आप्पा आनी सुधा आज्जी या  माझ्या दोन सर्वांत प्रीय व्यक्तींचा जास्त ऊल्लेख केला आहे . कारन मि माझ्या आजी आजोबांवर खुप प्रेम करते म्हनुन  हे माझे , H.M. बने T.M. बने  मधिल आवडते  पात्र आहेत . तस तर पूर्ण बने कुटुंबावर कविता करायची म्हनल तर भरमसाठ मोठी होईल . कारन बने कुटुंबात एवढया छान गोष्टी आहेत बोलन्याकरता की , त्या एका कवितेत पुरनार नाहीत .  कितीही लीहील तरी वाटेल अरे हे तर राहुन गेल , कारन तुमच्या या मालीकेतुन तुम्ही प्रत्येक अवघड प्रश्न सोपा करुन समजावता ,ते ही अगदि मोठ्यांपासुन तर लहानांपर्यंत सर्वांना . मग ते जिवनातले धडे असो किव्वा अनुभवांची शिकवनुक , त्यातुन तुम्ही अनेक समस्यांचे खुप सहजतेने आनी परफेक्ट ऊत्तर देऊन जाता . 

खर तर टी व्हि वर असंख्य मालीका आहेत . पन  आगोदर मात्र  मि माझि आवडती  ," तारक मेहता का ऊलटा चशमा " सोडुन एकही सीरीयल बघत नव्हते . मात्र तुमची  ही हम बने तुम बने  पहीली  मराठी सिरीयल आहे जी  मि ईतक्या आवडीनि पाहीली असेल .

कारन , तुमची मालीका ही दैनदिन जिवनातल्या सुख दुख्खाच्या घडामोडीपासुन तर लहान मोठयांच्या प्रत्येक समस्येच हसत हसत समाधानकारक ऊत्तर देनार अस इक जादुच पुस्तक आहे कि ज्यात  . प्रत्येक प्रश्नांच अगदी सहज सोपे ऊत्तर हे नेहमिच भेटते . म्हनुन ही सुंदर मालीका पुन्हा पुन्हा  मनाला जीव लाऊन जाते . 

 [ आजकाल दुसरया सर्व मालीकेत सासु सुनांचे भांडन , हीचा नवरा तिच्यासोबत , लव स्टोरी , त्यात शडयंत्र . असलच काहीतरी प्रत्येक मालीकेत  दिसत असत . म्हनुन मि  भांडनाची एकही मालीका बघत नाही .
तो ही मनोरंजनाचा च इक भाग  आहे .  पन मला  सासु सुनाची भांडन बघुन काय आऊटपुट भेटत . ? माझ्या मते आपल्या मनात चुकिच्या गोष्टी रोवल्या जातात .  आनी मला असेही वाटत अशा भांडनाच्या मालीकेतुन आपल्या चांगल्या सासु सुने बद्दल चुकिच वाटन्याची शक्यता होऊ शकते म्हनुन मि हे बघन टाळते . )

आनी या पलीकडची तुमची ही सुंदर अशी सीरीयल आहे . ज्यातुन फ्क्त आनंद आनी प्रेम भेटत.  तुमचे एपिसोड पाहुन प्रत्येक नाती घटट होत असतिल . यात भांडन झाले तरी त्याचा प्रेमळ असा शेवट होतो तेही चांगल्या शिकवनुकिने . 

बने कुटुंब हे सर्व गोष्टीनी परीपुर्न आहे . यात सई , पार्थ  , रेहा सारखे गोड नातवंड आहेत . त्यांचे निरागस प्रश्नांना ऊत्तर देनारया प्रीय सुधा आज्जीच बोलन ,   सर्वांना प्रेमाने समजावन   , सर्व समस्यांना होनारे हसत  हसत समाधान आनी त्यातली नात्यांची एकजुट अशी जोड ही बघायला खुपच आवडत.   असा हा अगदीच आपलासा करनारा तुमचा परीवार आहे .एक दिवसही ही मालीका बघितली नाही तर  करमत नाही अग चुकल्या चुकल्यासारख वाटत . तुमच्या ह्या परीवाराने अगदीच आपलस करुन टाकल आहे . 



Friday, 1 March 2019

अरे देवा ! प्लिज ऐक ना जरा !

     
असे का होते,
 मला जे नको तेच का बर होते . ? 
का बरे तरी देवाने असे कराव . ? 

नको होते जे मला ,
तेच का माझ्या ओंजळीत माराव .? 
   
 कितीदा हे माझ तुला विनवन .! 
 पन तुझ तर हे नेहमिचच मला  हिणवन ! 

का रे तु सतत अस कराव . ? 
    आनी मिही कितीदा तरी तेच बोलाव .! 

या रूसने फ़ुगन्यात नव्हे काही गैर . ! 
          कारन तुजे नी माझे  आहे तरी कुठे वैर ! 

        माहीत आहे मला तुजी ढगा प्रमाने दया ! 
   ठेस लागता क्षणि वर्षावलेली ती अटूट माया !

आठवतो एकटेपनी दिलेला तो सोबतीचा हात ,
    आनी आठवते तु दाखवलेली ती योग्य वाट! 

आहे मि जानुंन करतोस तु पर्वा ! 
         पारखुन मनातले , मात्र देतोस तु सर्वां !
       
 बस ठेऊन मनी श्रद्धा आनी सबुरी !
मग हमखास भरतो तु ,
आनंद नी ऊल्हासाची तिजोरी ! 

हिच तर आहे त्याची सुवर्न काया ! 
आनी हेच खरे ते मुर्तितले भाव ! 

  मनी आहे ज्याला त्याची खरि माया ,
हे मात्र ऊमजेल अगदी त्यालाच !


                       !! ओम साई राम !!
///////////////////// //////// //////// ///////// //////// ///////


काय मग . . फूलपाखरांनो .
 

कशी वाटली आजची कविता  . ? 

सुरवातिला वाचुन वाटले असेल गोड तक्रार नोंदवली आहे देवाकडे . जी आपन प्रत्येकजन करतो . कि मला हे नाही दिल ते नाही झाल . 
  कधी कधी मलाही वाटल असे . मिही करायचे आगोदर  देवाकडे तक्रारी . पन मला माझ्या सर्व प्रश्नांची ऊत्तर भेटली आहेत आता . तर तक्रार नाही करत मात्र मनातल सर्व बोलते . कारन मि अस अनुभवल . ज्या गोष्टीसाठी मी देवाकडे कधी झगडले ,रुसले असेल . ति गोष्ट माझेसाठी त्रासदायक ठरेल म्हनुन मला दिली नव्हती त्याने . मला त्या गोष्टीनी खोटी भुरळ पाडली होती त्या गोष्टीचे खरे रुप माझेसमोर आनले . आनी मला मोठया खड्यात पडन्यापासुन वाचवले . 
म्हनुनच मला माझ्या चुकीची जानीव झाली कि ,
मि देवाकडे ईतके दिवस माझि बरबादी मागत होते . जो हटट देवाने पुर्न न करुन हे प्रुफ केल कि तो आपल्या बरोबर नेहमी असतो आनी आपल्याला वाईट गोष्टी आनी वाईट मानसे यांच्यापासुन प्रोटेक्ट करत असतो . 
तो आपल्याला माहीत नसनारया फसव्या लोकांचे डाव पेचात पाडतो . आनी आपल्याला कधी प्रीय वाटनारया त्या खोटया लोकांना आपल्या आयुष्यातुन दुर फेकतो . आनी कदाचित तेव्हा आपल्याला वाटते आपन खुप काही गमामवल त्या व्यक्तिविना किव्वा कुठल्या गोष्टीविना . पन नंतर समजत . आपल्या पासन दुर केलेले ते लोक किव्वा एखादि गोष्ट जीच्यासाठी आपन रडत होतो ति दुर गेल्याने .  पन नंतर जानीव होते ति किति घातक ठरली असती आपल्यासाठी . 
ज्या गोष्टीमागे आपन धावत असतो ती गोष्ट कालांतराने फसवी आनी खोटी निघते . मग समजते आपल्याला देवानी का नाही दिली ति गोष्ट. आपन देवाला सतत बोलतो ना माझ चांगल कर एन मग तो घान गोष्टी कसकाय बर आपल्या जवल येऊ देईल . आनी हे समजत तेव्हा मग आपन देवाच आभार मानतो . हेच सर्व माझ्या कवितेतल जडलेल गुढ . आनी ,

:) मला माझ्या आयुष्यात आलेला हा  अनुभव आला आहे . म्हनुन मि हा ब्लोग लीहीला . आनी ही कविता केली ज्यांचेवर माझा खुप विश्वास आहे म्हनजे माझे  !! साई बाबा !!

हो त्यांचेवर  माझा खुप विश्वास आहे आनी आयूष्यातल्या प्रत्येक चढ ऊतार ,चांगले वाईट दिवसात मला त्यांनी साथ दिलीये . म्हनुनच ईतकी झटकन कविता बनली देवावर . 
कारन एरवी कविता करायला  शब्द सुचावे लागतात. पन ज्या चांगल्या वाईट धडा घेतलेल्या  गोष्टी आपन अनुभवल्या असतात .  ते क्षण आपल्या मनात ऊतरतात . म्हनुनच त्यावर कविता करायला विचार नाही करावा लागत फारसा . 

तर कसा वाटला मग आजचा ब्लॉग :) आनी कविता . ? देवावर विश्वास असनार्यांना नक्किच आवडला असनार ! आनी बरेच अनुभवही आठवले असतील . . .हे नक्किच :)

    आनी  तसेही , आज खुप दिवसांनी मला ब्लॉग चे दर्शन झाल :) 

कारन हात मोडला असल्याने नविन वर्षाचा

संकल्प तर तुटलाच रोज ब्लोग लिहीन्याचा . पुन्हा मुडी ब्लोग्स सुरु  . . झाले . . पन लवकरच डेली ब्लोग्स करन्याचा प्रयत्न असेल . 



  तर मग भेटूत पुढच्या ब्लॉग  मधे . . 
मस्त रहा , मस्ती करा पन प्लिज : ,  हात पाय मोडू नका माझेसारखा ;) :) 
 . . . . बाय बाय . . . . फुलपाखरांनो :) 





Monday, 21 January 2019

वाढदिवसाच्या शुभेच्छा डीयर आजोबा

हैप्पी बर्थडे डियर आजोबा :)
माझे बाबा म्हनजे माझे आजोबा . आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे . याचा खुप आनंद होतोय. ते माझ्यासाठी  देवासारखे प्रीय आहेत . जसे मला माझे साई बाबा आनी गनु जी प्रीय आहेत तसे ! 
      माझे आजी आनी आजोबा हे माझेसाठी आई वडिलांच्या आगोदर येतात . कारन  आई वडीलांचे कर्तव्य हे माझ्या आजी बाबांनेच पार पाडले , माझा संभाल करुन . अगदी माझ्या आई - वडीलांपेक्षा ही माझेवर जास्त प्रेम केले आहे त्यांनी . 
हो तुम्हाला वाटेल प्रत्येक आजी आजोबा आपल्या नातवंडाना अपार जिव लावतात . पन 
माझे आजी आजोबांनी मी सहा महीन्याची असल्या पासुन माझा संभाळ केला . मला हव ते दिल . माझे सर्व लाड पुरवले . त्यांच्यासोबत घालवलेल ते बालपन माझेसाठी आत्तापर्यंतचे सर्वांत सुंदर दिवस होते  . कारन , जेव्हा माझे जन्मदाते त्यांच्या संसारिक तान तनावांत व्यस्त होते . ते लहानपनीच  आई वडीलांच प्रेम  हे मला फक्त आनी फक्त माझ्या आजी आजोबांकडन भेटल आहे . म्हनुन ते माझेसाठी सर्वात आगोदर येतात . कारन  ,त्यांना मि आई वडीलांऐवजी बालपनापासन माझ्या आसपास बघत आले . त्यांची प्रत्येक गोष्ट , प्रत्येक आठवन , त्यांचा प्रत्येक शब्द ना शब्द हा माझ्यासाठी मौल्यवान आहे . 
            " माझे आजोबा " 
 :)  मला आजही आठवते ते बाबांचे लहानपनी मला सायकल ला बासकेट लाऊन  . त्यात बसुन मला फिरवन , शाळेत सोडवन आनन .आनी  जाताना रोज ते पाच रुपयाच चोको मोको बिस्किट खात खात येन :)  
त्याचबरोबर  ति नगर ची बाग . बाबांसोबत बागेत ते झोका आनी भेळ खाने .  घरी येऊन आज्जी चा ओरडा ऐकने :) हे सर्वच अगदी मनाशी आहे आजही .
नुसत आठवल तरी मि  डोळे बंद करुन त्या दिवसात जाऊ शकते ईतके ते जिवंत दिवस मला अगदी जशे च्या तशे आठवतात .  जस आत्ता कालच घडल हे . एवढे मनाशी जपुन ठेवलेले आहेत मि ते आजी बाबांसोबत घालवलेले ते क्षण . असे आहेत माझे आजोबा . ना कूनाला दुखवतात . ना कुनाचे ऊपकार घेतात . त्यांनी मेहनतीने स्वताच्या जिवावर पुर्न घर संभालले . कूनाची इक पैशाचे ऊपकार नाही ठेवले कधी . आनी त्यांचा हाच हिमतीचा मार्ग मि आयुष्यात रोवला ,म्हनुन जेव्हा कधी मी ऊदास झाली असेल एकटी पडली असेल  तेव्हा हेच विचार करायची कि आजी बाबा यावर काय बोलले असते , हा विचार करताच मला सर्व प्रश्नाच समाधान भेटत होत .    म्हनुनच  गर्व आहे त्यांनी मला संभाळळ . 
      मि जिवंत आहे तोवर त्यांची शिकवनुक कधीही नाही विसरनार .  जेव्हा रस्ता भटकेल तेव्हा त्यांचे विचारांतुन प्रश्न सोडवन्याचा प्रयत्न करेन  , जसा आजवर करत आले .  

माझे आजोबा तस पाहील तर छोटया मुलांप्रमाने आहेत . गोड खायला आवडत . त्यांना गोड चालत नाही . ते गुपचुप होटेल मधन गुलाबजाम खान . मग आजी चा ओरडा ऐकन  , खुप क्यूट आठवनी आहेत. 

आनी एकदा तर त्यांनी गंम्मतच केली .
सर्वांना शक्तिमान सिरीयल लक्षात असेलच . बालपनी येत होती टी व्हि वर :) शनीवारी यायची  . तर मि ति सीरीयल बघन्यासाठी प्रत्येक शनीवारी भोकाड पसरायची .
 कारन ति सिरीयल चा टाईम आनी माझ्या शाळेचा टाईम बरोबरच होता . एरवी शाळा दिवसभर असायची . मात्र शनीवारी शक्तीमान च्या टाईमाला भरायची . मग दर शनीवारी शक्तीमान बघन्यासाठी रडारड चालायची एन ते शक्तीमान च गान सुरु असे पर्यंत माझ रडन्याचा सुर चालायचा . मग त्या सुराबरोबरच बाबा मला शाळेत पोहोच करायचे .
मग यावर ऊपाय म्हनुन बाबांनी खुप पत्र लिहीली शक्तिमान संपल्यावर जो पत्ता यायचा शेवटी त्यावर . आनी माझ्या शाळेतली शक्तिमानसाठी शाळा बुडवनारी पोर त्याचे पालकांशी शाळा सुटल्यावर चर्चा झाली . मग सर्वांनी शक्तिमान चा टाईम बदलन्यासाठी पत्र पाठवली . आनी थोडे दिवसांनी खरच टाईम बदलला होता . कि डबल प्रसारन सुरु झाल होत . काहीतरी झालत हे नक्की  . कदाचित एवढया पत्रांचा परीनाम असेल . 
असे माझे बाबा माझेसाठी छोटया पोरालाही चिडवतील  . एकदा काय झाल  . माझा शाळा आनी चित्रकलेत नेहमी पहीला नंबर असायचा . 
एकदा माझा दुसरा नंबर आला . आनी गल्लीतल्या गिरमे चा पहीला . 
    मग शाळा  सुटल्यावर घरी येताना त्याच घर लागायच . तो चिडऊ लागला येता जाता . कि  मि पहीला नंबर घेतला घेतला म्हनुन , 
      मग बाबा त्याला म्हनले एवढेच वर्ष आहे पुन्हा आम्ही इक नंबर ला येनार . आनी रोज घरी गिरमे ला पहील नाही येऊ द्यायच अशी लाडी गोडी लाऊन अभ्यासाला जादा वेळ बसऊ लागले .  आनी मग जेव्हा दुसरयान्दा पुन्हा पहीला नंबर पटकावला . तेव्हा घरी जाताना त्या गिरमे ला बाबांनी निकालपत्र त्याचे घरच्यांसकट वाचुन दाखवल .  मग त्याच चिडवन बंद झाल . मि चिडवायचि त्याला मग . हे बघुन स्मित हास्य करायचे बाबा आनी त्या गिरमे च्या घरचे .  .  किती गमतीशीर ना ! 
माझेसाठी बाबा लहान बनायचे स्वता . माझेसाठी 50 शकालका बुम बुम च्या पेंन्सिल्स जमा केल्या होत्या . मला शकालका बुंम बुंम खुप आवडायच . मि कूठही दुकानात पेंसील बघितली कि हटट करायचे घ्यायचा . बाबा प्रत्येकदा घ्यायचे :) अशा बरयाच पेंसिल जमवल्या होत्या मि .
मग जेव्हा मला खात्री पटली कि या पेंसील नी जादु काय होत नाही ;) मग तेव्हा माझा नाद सुटला तो . 
पेंसिल बरोबर आनखि खुप आठवनी आहेत बाबांच्या ज्या ब्लोग मधे पुरेपुर  मावनार नाही . बोलत बसले तर वाढतच जाईल ब्लोग .  
एकदा मि जेवली नव्हती रुसुन . तर रात्री साडे 10 ला सायकल वर फिरुन आनल . फ्रूट सलाद आनी माझ्या आवडीच खाऊ च घातल .  
      तर माझ्या शाळेतल कार्यानुभव चे मातीची फळे करन्यापासुन सर्व गोष्टीत बाबांच सहभागी होन .आनी मला लहानपनी आनलेला तो कर्नाटकचा घागरा . ती बाहुली अशा मोजता न येनार ईतक्या गोष्टी सापडतिल आनी त्या वस्तुनबरोबर सुंदर , मजेदार आठवनी . अनेक आहेत . 
अशे माझे प्रीय आजोबा  . त्यांच्या बालपनीच्या आठवनीना ऊजाळा देत मि आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना हा ब्लोग डेडीकेट करते . त्याना फोन करुन विश करेन तेव्हा वाचायलाही देईल . आनी सांगेल बघा माझे सर्व लक्षात आहे :)  मिस यू दादा (बाबा ) आनी माझि क्यूट आज्जी :) i love you forever .  
    मि साई बाबा ना खुप मानते . त्यांना आज मि माझे बाबांसाठी ऊत्तम तब्येत मागेल . सुखात जिवन . ऊदंड आयुष्य  . माझे आयुष्य ही माझ्या बाबांना भेटो हीच साई चरनी प्रार्थना  आहे … आनी ते सर्व मला न सांगताच देतात . 
                "  ओम साई राम " 

              तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लोग मधे . मि मधे आजारी पडल्याने न्यू ईयर चा संकल्प टूटला रोज ब्लोग लिहीन्याचा  . पन लवकर बरी होऊन डेली ब्लोग लिहीन्याचा प्रयत्न नक्की करेन . 
     

              तर नेहमिप्रमाने आजचा  ब्लोग कसा वाटला हे नाही विचारनार कारन हा ब्लोग मि फक्त बाबांसाठी लिहीला आहे . आनी तुम्हालाही वाचुन  आपल्या आजी आजोबा ची आठवन नक्किच येईल ही खात्री आहे . 
  बाय बाय डीयर फ्रेंड्स  .  पुन्हा भेटूत . खुष रहा मस्त रहा . . .ब्लोग लिहा . . ब्लोग वाचा :) 


 / / / / / / / / / / / /;/ / / / / / / /;/ / / / / / / / / / // / / /
  








आदित्य ह्रिदय स्तोत्र

    विनियोग ॐ अस्य आदित्यह्रदय स्तोत्रस्य अगस्त्यऋषि: अनुष्टुप्छन्दः आदित्यह्रदयभूतो भगवान् ब्रह्मा देवता निरस्ताशेषविघ्नतया ब्रह्माविद्यासि...