Thursday, 8 August 2019

डियर बने फ़ैमेली

एक गोड कुटुंबाचा सुखमय असा प्रवास , लाऊन जातो मना  प्रेमळ नात्यांची आस ! 

रोजच देऊन जाता तुम्ही नवनवे ध्यास . 

     प्रत्येक तुमचे बोल ,

 हे मुळीच नाही वाटत, फक्त इक भास . 

 तुमच्या कुटुंबात जरी असले ,

                 काल्पनिक पात्र .

आम्ही तर मात्र दररोज आहोत ,

                         अप्पांचे छात्र ! 

मग भलेही चढो त्यांचा पारा , 

किव्वा भेटूदेत त्यांचा ओरडयाचा मारा . 

पन निमुटपने ऐकतो त्यांच्या नियमांचे कौल.

कारन असतात  ते भारी अनुभवांचे बोल.

 मग चालो आप्पांच्या शब्दांच्या धारा ,

        किव्वा भेटो त्यांचा ओरडयाचा मारा .

तरीही हवा आम्हाला तो रागाचा तोरा ,

         कारन त्यात फक्त असतो ,

                 त्यांच्या काळजीचा वारा  ! 

म्हनुन तर ऐकतो निमुटपने ,

          त्यांचे नियमांचे कौल  ! 

कारन असतात ते भारी अनुभवाचे बोल . 

अशी ही आगळी वेगळी बने फैमेली ,

           कधीही ना कुठेही पाहीली . 

हसत खेळत शिकवतात तुम्ही 

 जिवनातले धडे .

      सावरतात त्यांना  जो कुनी ,

           ठेस लागुनी पडे . 

सुधा आज्जीची ति  प्रेमळ माया  , 

       ही मनी देऊन जाते ,

           आईची  सुखद छाया  !

आज्जी अन आजोबा असतातच 

 आनंदाचा पिटारा आनी

     सुख शांतीची तिजोरी . 

 त्यांचे खरे खुरे स्वरुप दाखवले  मात्र 

          बने कुटुंबातुन !

 जिव लागला त्यांच्यावर आमच्या 

       या अंतकरना:तुन !

 फिरवला आम्हावर हात मायेचा हळूवार ,          शिकऊन जोड ही नात्यांची घनदाट .

         साकारला तुम्ही  प्रेमाचा नवा नुर , 

                 दाखऊन योग्य ती वाट . 

म्हनुनच ऐकायचा रोज ,

     तुमचा प्रत्येक नविन किस्सा . 

       असेच  बनुन राहायच आम्हा ,

                बने कुटुंबाचा हिसा . 

         अशी ही डीयर फैमेली ,

घेऊन आली सुरेख  नात्यांची जोड .

           देऊन मायेची सावली , 

                  लाऊन गेली मनात प्रेमळ ओढ .

… … … … … … … … … … … … … … … … …
 … … … … … … … … … … … … … … … … …

कशी वाटली कविता . ? हे माझ बने कुटुंबावर असनार प्रेम मि कविता च्या माध्यमातुन व्यक्त करन्याचा प्रयत्न केला आहे . खर तर या  कवितेत मि  आप्पा आनी सुधा आज्जी या  माझ्या दोन सर्वांत प्रीय व्यक्तींचा जास्त ऊल्लेख केला आहे . कारन मि माझ्या आजी आजोबांवर खुप प्रेम करते म्हनुन  हे माझे , H.M. बने T.M. बने  मधिल आवडते  पात्र आहेत . तस तर पूर्ण बने कुटुंबावर कविता करायची म्हनल तर भरमसाठ मोठी होईल . कारन बने कुटुंबात एवढया छान गोष्टी आहेत बोलन्याकरता की , त्या एका कवितेत पुरनार नाहीत .  कितीही लीहील तरी वाटेल अरे हे तर राहुन गेल , कारन तुमच्या या मालीकेतुन तुम्ही प्रत्येक अवघड प्रश्न सोपा करुन समजावता ,ते ही अगदि मोठ्यांपासुन तर लहानांपर्यंत सर्वांना . मग ते जिवनातले धडे असो किव्वा अनुभवांची शिकवनुक , त्यातुन तुम्ही अनेक समस्यांचे खुप सहजतेने आनी परफेक्ट ऊत्तर देऊन जाता . 

खर तर टी व्हि वर असंख्य मालीका आहेत . पन  आगोदर मात्र  मि माझि आवडती  ," तारक मेहता का ऊलटा चशमा " सोडुन एकही सीरीयल बघत नव्हते . मात्र तुमची  ही हम बने तुम बने  पहीली  मराठी सिरीयल आहे जी  मि ईतक्या आवडीनि पाहीली असेल .

कारन , तुमची मालीका ही दैनदिन जिवनातल्या सुख दुख्खाच्या घडामोडीपासुन तर लहान मोठयांच्या प्रत्येक समस्येच हसत हसत समाधानकारक ऊत्तर देनार अस इक जादुच पुस्तक आहे कि ज्यात  . प्रत्येक प्रश्नांच अगदी सहज सोपे ऊत्तर हे नेहमिच भेटते . म्हनुन ही सुंदर मालीका पुन्हा पुन्हा  मनाला जीव लाऊन जाते . 

 [ आजकाल दुसरया सर्व मालीकेत सासु सुनांचे भांडन , हीचा नवरा तिच्यासोबत , लव स्टोरी , त्यात शडयंत्र . असलच काहीतरी प्रत्येक मालीकेत  दिसत असत . म्हनुन मि  भांडनाची एकही मालीका बघत नाही .
तो ही मनोरंजनाचा च इक भाग  आहे .  पन मला  सासु सुनाची भांडन बघुन काय आऊटपुट भेटत . ? माझ्या मते आपल्या मनात चुकिच्या गोष्टी रोवल्या जातात .  आनी मला असेही वाटत अशा भांडनाच्या मालीकेतुन आपल्या चांगल्या सासु सुने बद्दल चुकिच वाटन्याची शक्यता होऊ शकते म्हनुन मि हे बघन टाळते . )

आनी या पलीकडची तुमची ही सुंदर अशी सीरीयल आहे . ज्यातुन फ्क्त आनंद आनी प्रेम भेटत.  तुमचे एपिसोड पाहुन प्रत्येक नाती घटट होत असतिल . यात भांडन झाले तरी त्याचा प्रेमळ असा शेवट होतो तेही चांगल्या शिकवनुकिने . 

बने कुटुंब हे सर्व गोष्टीनी परीपुर्न आहे . यात सई , पार्थ  , रेहा सारखे गोड नातवंड आहेत . त्यांचे निरागस प्रश्नांना ऊत्तर देनारया प्रीय सुधा आज्जीच बोलन ,   सर्वांना प्रेमाने समजावन   , सर्व समस्यांना होनारे हसत  हसत समाधान आनी त्यातली नात्यांची एकजुट अशी जोड ही बघायला खुपच आवडत.   असा हा अगदीच आपलासा करनारा तुमचा परीवार आहे .एक दिवसही ही मालीका बघितली नाही तर  करमत नाही अग चुकल्या चुकल्यासारख वाटत . तुमच्या ह्या परीवाराने अगदीच आपलस करुन टाकल आहे . 



No comments:

Post a Comment

आदित्य ह्रिदय स्तोत्र

    विनियोग ॐ अस्य आदित्यह्रदय स्तोत्रस्य अगस्त्यऋषि: अनुष्टुप्छन्दः आदित्यह्रदयभूतो भगवान् ब्रह्मा देवता निरस्ताशेषविघ्नतया ब्रह्माविद्यासि...