Thursday, 8 August 2019

जा रे जा रे पावसा !


^^:^^:^^^^:^^:^^

       भल्या पहाटे आली लहर ,

                 स्वप्नांनी केला भारी कहर  .
                         स्मरणी दाटला वसंत रूतुचा बहर  .
               आठवली ती रम्य हिरवळ ,
                      अन भिजण्यासाठीची आतुर तारांबळ .

 म्हणूनच आली वाटुन हळहळ आज काहीशी 

    अन आतुरताही  झाली का जणु नाहीशी. 
              कारण दिसेना तो बहर ,
                    अन दिसेना ती हिरवळ .
     कारण सुखाच्या त्या सरींवर घालुनीया झडप,
                झाली आहे आजकाल अगदीच ती गडप .

     जणु का आजकाल बदलले ऋतूंचे स्वरूप,

           अन दिसेनासे झाले मोहक सरींचे हुरूप      
               झाला दडपुनिया तो वसंत ऋतू चा नूर ,
          अन पावसाची ती मजाच गेली जणुं दूर .

    कारण हरवलाय तो पावसाचा थाट , 

                      दुरावली ती सौम्य सरींची मजा , 
                अन हरवली आनंददायी पावसाची  ती वाट .

...........................................................................                       .............................
              .............................................

            😊☺☺☺  पाऊस ☺☺☺😊

      पाऊस . . . ! म्हणलं की चेहऱ्यावर येते ती खूप मोठी स्माईल ☺ कारण पाऊस हे नेहमी माझं जाम आवडणार कुतूहलच राहीलय , मात्र 

" पाऊस " खर तर हा शब्द घेता  क्षणी डोळ्यांत  अगदी त्या पावसाच्या सुरेख सरींनी भिजणारी ती हिरवळ , अन पाऊस येऊन गेल्यानंतरचा तो गार वाऱ्याचा स्पर्श आणी चहूकडे नितळ परिसर जणु  सर्वकाही धुवून नवे कोरे झाल्यासारखे अशे स्पष्ट मोहक रम्य वातावरण ,☺ हे सर्व फक्त पाऊस या एका शब्दातच आधी आठवायचं.
मात्र आता त्या पावसाच्या छान वाटणाऱ्या आठवणी  जणु दिसेना झाल्या आहेत . 😢
आज पहाटे पहाटे पावसाचं स्वप्नं पडलं . त्यात जुन्या पावसाच्या दिवसाची आठवण झाली . त्यात सुखद असा पाऊस होता अन पाऊस पडून गेल्यावरची ती हिरवळ  अन ती फुलांची बहरलेली बाग आणी त्यावर बागडणारी रंग बिरंगी फुलपाखरं ही होती . अस ते डोळे दिपवून टाकणार दृश्य बघुन अगदी बालपण च डोळ्यासमोर उभं राहिलं .
आनी जेव्हा स्वप्नलोकातून बाहेर आले तेव्हा वाटलं की ,
का श ! ते स्वप्न तुटलं नसते तर ,☺ ? कारण खूपच मनाला तृप्त करून टाकणार दृश्य होत ते आणि विशेष म्हणजे हे स्वप्न मला मला माझ्या बालपणा च्या पावसात घेऊन गेल. ज्यात स्वप्नाप्रमाणेच खरा खुरा पाऊस होता आणि मी अनुभवलेलं ते बागेतील  फुलपाखरांचं बागडन आणी ते पावसानी फुलांचं बहरन  . या सुरेख वातावरणाचा अस्वाद तर बालपणी घेतला असावा , कारण आजकाल पावसाचं स्वरूप च बदलून गेले आहे . जो मी कवितेतही उल्लेख केला आहे . म्हणून तर मी कवितेच्या सुरवातीला स्वप्नातला सुरेख पाऊस आणि स्वप्न तुटल्यावर जो आठवला तो म्हणजे आजचा  बदलत चाललेला पाऊस या दोन्हींचा उल्लेख केला आहे .  आणी अगदी मी हा ब्लॉग लिहिला , तेव्हा रात्रीपासून पाऊस चालूच होता . पण तरीही मला माज्या स्वप्नी दिसलेला आपल्या बालपणीच्या पावसाचा उल्लेख करावा वाटला . कारण तो मला आजच्या पावसाच्या तुलनेत खूपच खास वाटला .
कारण आजकाल माजी पावसाची मजा जणु गडप झाली आहे . रोज सकाळी उठल्यावर टी व्ही वर पावसाने किती लोक बेघर झाली , कुणी वीज पडुन गेलं तर कुनी खड्ड्यात पडलं तर कुणाची घर पडली तर कुनाच्या गावात भरमसाठ पूल आला आहे , आणि म्हतारी माणस बोटींनी सुखरूप ठिकाणी पोहोचवले जाताय . या अशा सर्व बातम्या रोज सकाळी कानावर पडताय , या घटनांनी पाऊस म्हणजे पूर , वीज हानी - जीवितहानी , प्राणी , माणसे यांच्या यातना च डोळ्यासमोर येऊ लागल्या आहेत. आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एक भयाण बातमी कानावर पडली की, चार गायी पुरात वाहून गेल्या , ते टी व्ही वरच दृश्य डोळ्यासमोरून हलत नव्हतं . मन भरूनआलं अगदी , आता त्या बिचाऱ्या गायीची काय चूक होती ? या नैसर्गिक आपत्ती ने त्या गायींना मारलं . जीव खूप कासावीस होत आहे असल्या बातम्या बघुन . म्हणुन पावसात ती बालपणीची सौम्य वाटणारी मजा ते भिजणं जणु हरवलं आहे आज , पावसाचा मारा रोज काहीतरी नुकसान करून गेलेल्या बातम्या झळकत आहेत . अस पाहुन मला  माजा आवडता पाऊस अगदी नकोसा झाला होता .
आणि यात ते पावसाचं गाण आठवलं

 " ये रे ये रे पावसा " पण आज ना ती उत्सुकता वाटते ना ती पावसाची हौस , जेव्हा जेव्हा या पावसामुळे गेलेले बळी , पुरामुळे बेघर झालेले लोक , सैरावैरा धावणारे मुके प्राणी या चोवीस तास टी व्ही वर झळकत असणाऱ्या बातम्या जेव्हा कानावर पडताय ना तेव्हापासून हे पावसाचं गाणं पण नकोसे झाले आहे , मन सारख म्हणत आहे " जा रे जा रे पावसा " ,

               "  प्लिज , जा रे बाबा पावसा " !  

पण मात्र पुन्हा मनात विचार आले पाऊस नाही आला तर बिचाऱ्या शेतकरी लोकांच्या पिकांच काय .?  पिक म्हणजे शेतकऱ्यांच सर्वस्व , आणि त्यासाठी तर पाऊस हा हवाच आहे . तो ही भरपूर , पुरेसा . मन दुहेरी विचारांचा झोका खेळत च होत . शेवटी मनापासून  देवाला प्रार्थना करावंसं वाटली . सर्व त्याला सांगावस वाटलं ,  अखेर या सर्व विचारांवर माज मन देवाला एकच बोललं की , 

" प्लिज देवा , पाऊस हा भरमसाट च होऊदे अगदी " पण त्यात कुठलीही जीवितहानी नको होऊ देऊस . मुक्या जनावरांना या नैसर्गिक आपत्ती चा शिकार नको होऊ देऊ , सर्व प्राण्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळूदे , पावसात बिचाऱ्या प्राण्यांना खायला कुना ना कुणाकडून भेटुदे , मांजरीना दूध भेटुदे . कुणीही पावसाने बेघर नको होऊ देऊ , 

"कारण प्रत्येक च माणूस इतका श्रीमंत नसतो " की , पावसाने घर कोसळले म्हणून लगेच दुसर घर उभं करू शकेल . ! कारण आपलं छोटस घरसुद्धा कित्येक जनांनी रात्र दिवस एक करून मेहनतीच्या एक एक पैशांनी बनवलेलं असत .

या पावसाने कुणाला फरक नसलं पडत तो  फक्त सेलिब्रेटी लोकांना , ते दहा घर घेऊ शकतात , मात्र गरीब लोकांचे घर गेल्यावर प्रचंड  हाल होतात . आणि राहिला प्रश्न प्राण्यांचा तर माज्या मनात हा विचार सारखा सतावत होता की ,  आपण या पावसात जनजीवन तर विस्कळीत झालं पण प्राण्यांचं काय मग . ? कुठं आसरा भेटत असेल त्यांना ? कोणी पावसात त्यांना खायला देत असेल की नाही .? 
 आपल्या पाळीव कुत्रा , मांजर याना दूध देतो रोज पोळी टाकतो मात्र जे कुणाच्या घरात नाहीत अशे फिरणारे प्राणी या भयाण पावसात कुठं जात असतील ते बिचारे ? काय खात असतील .? आपण कसे जिभेचे चोचले पुरवतो , पावसात चहा भजी चा आस्वाद घेऊन घरात शांत बसलेले असतो , मग प्राण्यांना पण या पावसात , गार वाऱ्यात किती भूक लागत असेल .?  या अश्या अनेक विचारांनी माझ्या मनात तुफान च उठवल . आणी म्हणून च पहाटे पहाटे पावसच्या त्या सुंदर स्वप्नाच्या आनंदापेक्षा या आजकालच्या पावसाच्या रौद्र स्वरूपाचं च नवल वाटलं , भीती वाटली आणि अनेक विचारांनी मनात वादळ उठवलं . मग जरा मन शांत करून देवाला आठवलं या
विचारांनी अस्ताव्यस्त झालेल्या मनाची समजूत घालायला म्हणून सारख देवाला मनापासून एकच विनंती येत होती  की ,
 "देवा पाऊस हा पुन्हा  बालपणी सारखा होऊदे जसा मी माज्या बालपणी बघितला अनुभवला होता  " तो  सौम्य पाऊस परत दे प्लिज !  ज्यात कुणाचंही नुकसान नाही होणार , शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळेल , लहान मुले पावसाचा आनंद घेऊ शकतील असा विजरहीत पाऊस ,  जनावरे , घरे ही सुखरूप राहोत , असा हा सौम्य निखळ पाऊस तर सर्वानाच आवडेल . असा पाऊस पडला तर खूपच छान होईल असा विचार आणी देवाला प्रार्थना करता करता कधी पुन्हा झोप लागली कळलंच नाही , मात्र हे सर्व विचार , ते पावसाचे स्वप्न हे मनात घोळतच होत .आणि जाग आली ती नेहमीच्या वेळेला म्हणजे सकाळी आठ वाजता ,☺पण मात्र नेहमीसारखी टी व्ही चालू करताना मनात  भीतीदायक पावसाच्या बातम्यांची कुठलीही धास्ती नव्हती . कारण , झोपेत भल्या पहाटेच सर्व घटनांची जवाबदारी देवावर सोपवली होती म्हणून खात्री होती तो नक्की ऐकेल , कारण निस्वार्थ इच्छा देव नक्कीच ऐकतो म्हणून ते स्वप्न आणि देवाला केलेली प्रार्थना हे आठवून चेहऱ्यावर एक  स्मित हास्य आलं आणि  दिवसाची एक  छान सुरुवात झाली ☺☺☺   आणि आता पावसाच गाणे म्हणायचच असेल तर जा रे जा रे पावसा ऐवजी , 
 " पावसा रे पावसा , हळुवार ये रे पावसा ! अस म्हणण्यात काहीच वावग नाहीये ,☺☺☺

                तर मग कसा वाटला ब्लॉग .? 

      पावसाच्या फ़क्त छान छान। आठवणींपेक्षा जरा रियरिटी ची ही जाणीव आजच्या स्वप्नातून झाली . म्हणुन आजचा ब्लॉग जरा मोठा झाला . 

कसा वाटला ब्लॉग हे नक्की कळवा ☺
 भेटुयात पुढच्या ब्लॉग मधे . बाय बाय फुलपाखरानो ☺आपल्या या  "स्वच्छंद  फुलपाखरू"  वर पुन्हा नक्की या ☺ बाय बाय 
☺☺☺
                             ☺☺☺☺



डियर बने फ़ैमेली

एक गोड कुटुंबाचा सुखमय असा प्रवास , लाऊन जातो मना  प्रेमळ नात्यांची आस ! 

रोजच देऊन जाता तुम्ही नवनवे ध्यास . 

     प्रत्येक तुमचे बोल ,

 हे मुळीच नाही वाटत, फक्त इक भास . 

 तुमच्या कुटुंबात जरी असले ,

                 काल्पनिक पात्र .

आम्ही तर मात्र दररोज आहोत ,

                         अप्पांचे छात्र ! 

मग भलेही चढो त्यांचा पारा , 

किव्वा भेटूदेत त्यांचा ओरडयाचा मारा . 

पन निमुटपने ऐकतो त्यांच्या नियमांचे कौल.

कारन असतात  ते भारी अनुभवांचे बोल.

 मग चालो आप्पांच्या शब्दांच्या धारा ,

        किव्वा भेटो त्यांचा ओरडयाचा मारा .

तरीही हवा आम्हाला तो रागाचा तोरा ,

         कारन त्यात फक्त असतो ,

                 त्यांच्या काळजीचा वारा  ! 

म्हनुन तर ऐकतो निमुटपने ,

          त्यांचे नियमांचे कौल  ! 

कारन असतात ते भारी अनुभवाचे बोल . 

अशी ही आगळी वेगळी बने फैमेली ,

           कधीही ना कुठेही पाहीली . 

हसत खेळत शिकवतात तुम्ही 

 जिवनातले धडे .

      सावरतात त्यांना  जो कुनी ,

           ठेस लागुनी पडे . 

सुधा आज्जीची ति  प्रेमळ माया  , 

       ही मनी देऊन जाते ,

           आईची  सुखद छाया  !

आज्जी अन आजोबा असतातच 

 आनंदाचा पिटारा आनी

     सुख शांतीची तिजोरी . 

 त्यांचे खरे खुरे स्वरुप दाखवले  मात्र 

          बने कुटुंबातुन !

 जिव लागला त्यांच्यावर आमच्या 

       या अंतकरना:तुन !

 फिरवला आम्हावर हात मायेचा हळूवार ,          शिकऊन जोड ही नात्यांची घनदाट .

         साकारला तुम्ही  प्रेमाचा नवा नुर , 

                 दाखऊन योग्य ती वाट . 

म्हनुनच ऐकायचा रोज ,

     तुमचा प्रत्येक नविन किस्सा . 

       असेच  बनुन राहायच आम्हा ,

                बने कुटुंबाचा हिसा . 

         अशी ही डीयर फैमेली ,

घेऊन आली सुरेख  नात्यांची जोड .

           देऊन मायेची सावली , 

                  लाऊन गेली मनात प्रेमळ ओढ .

… … … … … … … … … … … … … … … … …
 … … … … … … … … … … … … … … … … …

कशी वाटली कविता . ? हे माझ बने कुटुंबावर असनार प्रेम मि कविता च्या माध्यमातुन व्यक्त करन्याचा प्रयत्न केला आहे . खर तर या  कवितेत मि  आप्पा आनी सुधा आज्जी या  माझ्या दोन सर्वांत प्रीय व्यक्तींचा जास्त ऊल्लेख केला आहे . कारन मि माझ्या आजी आजोबांवर खुप प्रेम करते म्हनुन  हे माझे , H.M. बने T.M. बने  मधिल आवडते  पात्र आहेत . तस तर पूर्ण बने कुटुंबावर कविता करायची म्हनल तर भरमसाठ मोठी होईल . कारन बने कुटुंबात एवढया छान गोष्टी आहेत बोलन्याकरता की , त्या एका कवितेत पुरनार नाहीत .  कितीही लीहील तरी वाटेल अरे हे तर राहुन गेल , कारन तुमच्या या मालीकेतुन तुम्ही प्रत्येक अवघड प्रश्न सोपा करुन समजावता ,ते ही अगदि मोठ्यांपासुन तर लहानांपर्यंत सर्वांना . मग ते जिवनातले धडे असो किव्वा अनुभवांची शिकवनुक , त्यातुन तुम्ही अनेक समस्यांचे खुप सहजतेने आनी परफेक्ट ऊत्तर देऊन जाता . 

खर तर टी व्हि वर असंख्य मालीका आहेत . पन  आगोदर मात्र  मि माझि आवडती  ," तारक मेहता का ऊलटा चशमा " सोडुन एकही सीरीयल बघत नव्हते . मात्र तुमची  ही हम बने तुम बने  पहीली  मराठी सिरीयल आहे जी  मि ईतक्या आवडीनि पाहीली असेल .

कारन , तुमची मालीका ही दैनदिन जिवनातल्या सुख दुख्खाच्या घडामोडीपासुन तर लहान मोठयांच्या प्रत्येक समस्येच हसत हसत समाधानकारक ऊत्तर देनार अस इक जादुच पुस्तक आहे कि ज्यात  . प्रत्येक प्रश्नांच अगदी सहज सोपे ऊत्तर हे नेहमिच भेटते . म्हनुन ही सुंदर मालीका पुन्हा पुन्हा  मनाला जीव लाऊन जाते . 

 [ आजकाल दुसरया सर्व मालीकेत सासु सुनांचे भांडन , हीचा नवरा तिच्यासोबत , लव स्टोरी , त्यात शडयंत्र . असलच काहीतरी प्रत्येक मालीकेत  दिसत असत . म्हनुन मि  भांडनाची एकही मालीका बघत नाही .
तो ही मनोरंजनाचा च इक भाग  आहे .  पन मला  सासु सुनाची भांडन बघुन काय आऊटपुट भेटत . ? माझ्या मते आपल्या मनात चुकिच्या गोष्टी रोवल्या जातात .  आनी मला असेही वाटत अशा भांडनाच्या मालीकेतुन आपल्या चांगल्या सासु सुने बद्दल चुकिच वाटन्याची शक्यता होऊ शकते म्हनुन मि हे बघन टाळते . )

आनी या पलीकडची तुमची ही सुंदर अशी सीरीयल आहे . ज्यातुन फ्क्त आनंद आनी प्रेम भेटत.  तुमचे एपिसोड पाहुन प्रत्येक नाती घटट होत असतिल . यात भांडन झाले तरी त्याचा प्रेमळ असा शेवट होतो तेही चांगल्या शिकवनुकिने . 

बने कुटुंब हे सर्व गोष्टीनी परीपुर्न आहे . यात सई , पार्थ  , रेहा सारखे गोड नातवंड आहेत . त्यांचे निरागस प्रश्नांना ऊत्तर देनारया प्रीय सुधा आज्जीच बोलन ,   सर्वांना प्रेमाने समजावन   , सर्व समस्यांना होनारे हसत  हसत समाधान आनी त्यातली नात्यांची एकजुट अशी जोड ही बघायला खुपच आवडत.   असा हा अगदीच आपलासा करनारा तुमचा परीवार आहे .एक दिवसही ही मालीका बघितली नाही तर  करमत नाही अग चुकल्या चुकल्यासारख वाटत . तुमच्या ह्या परीवाराने अगदीच आपलस करुन टाकल आहे . 



आदित्य ह्रिदय स्तोत्र

    विनियोग ॐ अस्य आदित्यह्रदय स्तोत्रस्य अगस्त्यऋषि: अनुष्टुप्छन्दः आदित्यह्रदयभूतो भगवान् ब्रह्मा देवता निरस्ताशेषविघ्नतया ब्रह्माविद्यासि...