Friday, 1 March 2019

अरे देवा ! प्लिज ऐक ना जरा !

     
असे का होते,
 मला जे नको तेच का बर होते . ? 
का बरे तरी देवाने असे कराव . ? 

नको होते जे मला ,
तेच का माझ्या ओंजळीत माराव .? 
   
 कितीदा हे माझ तुला विनवन .! 
 पन तुझ तर हे नेहमिचच मला  हिणवन ! 

का रे तु सतत अस कराव . ? 
    आनी मिही कितीदा तरी तेच बोलाव .! 

या रूसने फ़ुगन्यात नव्हे काही गैर . ! 
          कारन तुजे नी माझे  आहे तरी कुठे वैर ! 

        माहीत आहे मला तुजी ढगा प्रमाने दया ! 
   ठेस लागता क्षणि वर्षावलेली ती अटूट माया !

आठवतो एकटेपनी दिलेला तो सोबतीचा हात ,
    आनी आठवते तु दाखवलेली ती योग्य वाट! 

आहे मि जानुंन करतोस तु पर्वा ! 
         पारखुन मनातले , मात्र देतोस तु सर्वां !
       
 बस ठेऊन मनी श्रद्धा आनी सबुरी !
मग हमखास भरतो तु ,
आनंद नी ऊल्हासाची तिजोरी ! 

हिच तर आहे त्याची सुवर्न काया ! 
आनी हेच खरे ते मुर्तितले भाव ! 

  मनी आहे ज्याला त्याची खरि माया ,
हे मात्र ऊमजेल अगदी त्यालाच !


                       !! ओम साई राम !!
///////////////////// //////// //////// ///////// //////// ///////


काय मग . . फूलपाखरांनो .
 

कशी वाटली आजची कविता  . ? 

सुरवातिला वाचुन वाटले असेल गोड तक्रार नोंदवली आहे देवाकडे . जी आपन प्रत्येकजन करतो . कि मला हे नाही दिल ते नाही झाल . 
  कधी कधी मलाही वाटल असे . मिही करायचे आगोदर  देवाकडे तक्रारी . पन मला माझ्या सर्व प्रश्नांची ऊत्तर भेटली आहेत आता . तर तक्रार नाही करत मात्र मनातल सर्व बोलते . कारन मि अस अनुभवल . ज्या गोष्टीसाठी मी देवाकडे कधी झगडले ,रुसले असेल . ति गोष्ट माझेसाठी त्रासदायक ठरेल म्हनुन मला दिली नव्हती त्याने . मला त्या गोष्टीनी खोटी भुरळ पाडली होती त्या गोष्टीचे खरे रुप माझेसमोर आनले . आनी मला मोठया खड्यात पडन्यापासुन वाचवले . 
म्हनुनच मला माझ्या चुकीची जानीव झाली कि ,
मि देवाकडे ईतके दिवस माझि बरबादी मागत होते . जो हटट देवाने पुर्न न करुन हे प्रुफ केल कि तो आपल्या बरोबर नेहमी असतो आनी आपल्याला वाईट गोष्टी आनी वाईट मानसे यांच्यापासुन प्रोटेक्ट करत असतो . 
तो आपल्याला माहीत नसनारया फसव्या लोकांचे डाव पेचात पाडतो . आनी आपल्याला कधी प्रीय वाटनारया त्या खोटया लोकांना आपल्या आयुष्यातुन दुर फेकतो . आनी कदाचित तेव्हा आपल्याला वाटते आपन खुप काही गमामवल त्या व्यक्तिविना किव्वा कुठल्या गोष्टीविना . पन नंतर समजत . आपल्या पासन दुर केलेले ते लोक किव्वा एखादि गोष्ट जीच्यासाठी आपन रडत होतो ति दुर गेल्याने .  पन नंतर जानीव होते ति किति घातक ठरली असती आपल्यासाठी . 
ज्या गोष्टीमागे आपन धावत असतो ती गोष्ट कालांतराने फसवी आनी खोटी निघते . मग समजते आपल्याला देवानी का नाही दिली ति गोष्ट. आपन देवाला सतत बोलतो ना माझ चांगल कर एन मग तो घान गोष्टी कसकाय बर आपल्या जवल येऊ देईल . आनी हे समजत तेव्हा मग आपन देवाच आभार मानतो . हेच सर्व माझ्या कवितेतल जडलेल गुढ . आनी ,

:) मला माझ्या आयुष्यात आलेला हा  अनुभव आला आहे . म्हनुन मि हा ब्लोग लीहीला . आनी ही कविता केली ज्यांचेवर माझा खुप विश्वास आहे म्हनजे माझे  !! साई बाबा !!

हो त्यांचेवर  माझा खुप विश्वास आहे आनी आयूष्यातल्या प्रत्येक चढ ऊतार ,चांगले वाईट दिवसात मला त्यांनी साथ दिलीये . म्हनुनच ईतकी झटकन कविता बनली देवावर . 
कारन एरवी कविता करायला  शब्द सुचावे लागतात. पन ज्या चांगल्या वाईट धडा घेतलेल्या  गोष्टी आपन अनुभवल्या असतात .  ते क्षण आपल्या मनात ऊतरतात . म्हनुनच त्यावर कविता करायला विचार नाही करावा लागत फारसा . 

तर कसा वाटला मग आजचा ब्लॉग :) आनी कविता . ? देवावर विश्वास असनार्यांना नक्किच आवडला असनार ! आनी बरेच अनुभवही आठवले असतील . . .हे नक्किच :)

    आनी  तसेही , आज खुप दिवसांनी मला ब्लॉग चे दर्शन झाल :) 

कारन हात मोडला असल्याने नविन वर्षाचा

संकल्प तर तुटलाच रोज ब्लोग लिहीन्याचा . पुन्हा मुडी ब्लोग्स सुरु  . . झाले . . पन लवकरच डेली ब्लोग्स करन्याचा प्रयत्न असेल . 



  तर मग भेटूत पुढच्या ब्लॉग  मधे . . 
मस्त रहा , मस्ती करा पन प्लिज : ,  हात पाय मोडू नका माझेसारखा ;) :) 
 . . . . बाय बाय . . . . फुलपाखरांनो :) 





Monday, 21 January 2019

वाढदिवसाच्या शुभेच्छा डीयर आजोबा

हैप्पी बर्थडे डियर आजोबा :)
माझे बाबा म्हनजे माझे आजोबा . आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे . याचा खुप आनंद होतोय. ते माझ्यासाठी  देवासारखे प्रीय आहेत . जसे मला माझे साई बाबा आनी गनु जी प्रीय आहेत तसे ! 
      माझे आजी आनी आजोबा हे माझेसाठी आई वडिलांच्या आगोदर येतात . कारन  आई वडीलांचे कर्तव्य हे माझ्या आजी बाबांनेच पार पाडले , माझा संभाल करुन . अगदी माझ्या आई - वडीलांपेक्षा ही माझेवर जास्त प्रेम केले आहे त्यांनी . 
हो तुम्हाला वाटेल प्रत्येक आजी आजोबा आपल्या नातवंडाना अपार जिव लावतात . पन 
माझे आजी आजोबांनी मी सहा महीन्याची असल्या पासुन माझा संभाळ केला . मला हव ते दिल . माझे सर्व लाड पुरवले . त्यांच्यासोबत घालवलेल ते बालपन माझेसाठी आत्तापर्यंतचे सर्वांत सुंदर दिवस होते  . कारन , जेव्हा माझे जन्मदाते त्यांच्या संसारिक तान तनावांत व्यस्त होते . ते लहानपनीच  आई वडीलांच प्रेम  हे मला फक्त आनी फक्त माझ्या आजी आजोबांकडन भेटल आहे . म्हनुन ते माझेसाठी सर्वात आगोदर येतात . कारन  ,त्यांना मि आई वडीलांऐवजी बालपनापासन माझ्या आसपास बघत आले . त्यांची प्रत्येक गोष्ट , प्रत्येक आठवन , त्यांचा प्रत्येक शब्द ना शब्द हा माझ्यासाठी मौल्यवान आहे . 
            " माझे आजोबा " 
 :)  मला आजही आठवते ते बाबांचे लहानपनी मला सायकल ला बासकेट लाऊन  . त्यात बसुन मला फिरवन , शाळेत सोडवन आनन .आनी  जाताना रोज ते पाच रुपयाच चोको मोको बिस्किट खात खात येन :)  
त्याचबरोबर  ति नगर ची बाग . बाबांसोबत बागेत ते झोका आनी भेळ खाने .  घरी येऊन आज्जी चा ओरडा ऐकने :) हे सर्वच अगदी मनाशी आहे आजही .
नुसत आठवल तरी मि  डोळे बंद करुन त्या दिवसात जाऊ शकते ईतके ते जिवंत दिवस मला अगदी जशे च्या तशे आठवतात .  जस आत्ता कालच घडल हे . एवढे मनाशी जपुन ठेवलेले आहेत मि ते आजी बाबांसोबत घालवलेले ते क्षण . असे आहेत माझे आजोबा . ना कूनाला दुखवतात . ना कुनाचे ऊपकार घेतात . त्यांनी मेहनतीने स्वताच्या जिवावर पुर्न घर संभालले . कूनाची इक पैशाचे ऊपकार नाही ठेवले कधी . आनी त्यांचा हाच हिमतीचा मार्ग मि आयुष्यात रोवला ,म्हनुन जेव्हा कधी मी ऊदास झाली असेल एकटी पडली असेल  तेव्हा हेच विचार करायची कि आजी बाबा यावर काय बोलले असते , हा विचार करताच मला सर्व प्रश्नाच समाधान भेटत होत .    म्हनुनच  गर्व आहे त्यांनी मला संभाळळ . 
      मि जिवंत आहे तोवर त्यांची शिकवनुक कधीही नाही विसरनार .  जेव्हा रस्ता भटकेल तेव्हा त्यांचे विचारांतुन प्रश्न सोडवन्याचा प्रयत्न करेन  , जसा आजवर करत आले .  

माझे आजोबा तस पाहील तर छोटया मुलांप्रमाने आहेत . गोड खायला आवडत . त्यांना गोड चालत नाही . ते गुपचुप होटेल मधन गुलाबजाम खान . मग आजी चा ओरडा ऐकन  , खुप क्यूट आठवनी आहेत. 

आनी एकदा तर त्यांनी गंम्मतच केली .
सर्वांना शक्तिमान सिरीयल लक्षात असेलच . बालपनी येत होती टी व्हि वर :) शनीवारी यायची  . तर मि ति सीरीयल बघन्यासाठी प्रत्येक शनीवारी भोकाड पसरायची .
 कारन ति सिरीयल चा टाईम आनी माझ्या शाळेचा टाईम बरोबरच होता . एरवी शाळा दिवसभर असायची . मात्र शनीवारी शक्तीमान च्या टाईमाला भरायची . मग दर शनीवारी शक्तीमान बघन्यासाठी रडारड चालायची एन ते शक्तीमान च गान सुरु असे पर्यंत माझ रडन्याचा सुर चालायचा . मग त्या सुराबरोबरच बाबा मला शाळेत पोहोच करायचे .
मग यावर ऊपाय म्हनुन बाबांनी खुप पत्र लिहीली शक्तिमान संपल्यावर जो पत्ता यायचा शेवटी त्यावर . आनी माझ्या शाळेतली शक्तिमानसाठी शाळा बुडवनारी पोर त्याचे पालकांशी शाळा सुटल्यावर चर्चा झाली . मग सर्वांनी शक्तिमान चा टाईम बदलन्यासाठी पत्र पाठवली . आनी थोडे दिवसांनी खरच टाईम बदलला होता . कि डबल प्रसारन सुरु झाल होत . काहीतरी झालत हे नक्की  . कदाचित एवढया पत्रांचा परीनाम असेल . 
असे माझे बाबा माझेसाठी छोटया पोरालाही चिडवतील  . एकदा काय झाल  . माझा शाळा आनी चित्रकलेत नेहमी पहीला नंबर असायचा . 
एकदा माझा दुसरा नंबर आला . आनी गल्लीतल्या गिरमे चा पहीला . 
    मग शाळा  सुटल्यावर घरी येताना त्याच घर लागायच . तो चिडऊ लागला येता जाता . कि  मि पहीला नंबर घेतला घेतला म्हनुन , 
      मग बाबा त्याला म्हनले एवढेच वर्ष आहे पुन्हा आम्ही इक नंबर ला येनार . आनी रोज घरी गिरमे ला पहील नाही येऊ द्यायच अशी लाडी गोडी लाऊन अभ्यासाला जादा वेळ बसऊ लागले .  आनी मग जेव्हा दुसरयान्दा पुन्हा पहीला नंबर पटकावला . तेव्हा घरी जाताना त्या गिरमे ला बाबांनी निकालपत्र त्याचे घरच्यांसकट वाचुन दाखवल .  मग त्याच चिडवन बंद झाल . मि चिडवायचि त्याला मग . हे बघुन स्मित हास्य करायचे बाबा आनी त्या गिरमे च्या घरचे .  .  किती गमतीशीर ना ! 
माझेसाठी बाबा लहान बनायचे स्वता . माझेसाठी 50 शकालका बुम बुम च्या पेंन्सिल्स जमा केल्या होत्या . मला शकालका बुंम बुंम खुप आवडायच . मि कूठही दुकानात पेंसील बघितली कि हटट करायचे घ्यायचा . बाबा प्रत्येकदा घ्यायचे :) अशा बरयाच पेंसिल जमवल्या होत्या मि .
मग जेव्हा मला खात्री पटली कि या पेंसील नी जादु काय होत नाही ;) मग तेव्हा माझा नाद सुटला तो . 
पेंसिल बरोबर आनखि खुप आठवनी आहेत बाबांच्या ज्या ब्लोग मधे पुरेपुर  मावनार नाही . बोलत बसले तर वाढतच जाईल ब्लोग .  
एकदा मि जेवली नव्हती रुसुन . तर रात्री साडे 10 ला सायकल वर फिरुन आनल . फ्रूट सलाद आनी माझ्या आवडीच खाऊ च घातल .  
      तर माझ्या शाळेतल कार्यानुभव चे मातीची फळे करन्यापासुन सर्व गोष्टीत बाबांच सहभागी होन .आनी मला लहानपनी आनलेला तो कर्नाटकचा घागरा . ती बाहुली अशा मोजता न येनार ईतक्या गोष्टी सापडतिल आनी त्या वस्तुनबरोबर सुंदर , मजेदार आठवनी . अनेक आहेत . 
अशे माझे प्रीय आजोबा  . त्यांच्या बालपनीच्या आठवनीना ऊजाळा देत मि आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना हा ब्लोग डेडीकेट करते . त्याना फोन करुन विश करेन तेव्हा वाचायलाही देईल . आनी सांगेल बघा माझे सर्व लक्षात आहे :)  मिस यू दादा (बाबा ) आनी माझि क्यूट आज्जी :) i love you forever .  
    मि साई बाबा ना खुप मानते . त्यांना आज मि माझे बाबांसाठी ऊत्तम तब्येत मागेल . सुखात जिवन . ऊदंड आयुष्य  . माझे आयुष्य ही माझ्या बाबांना भेटो हीच साई चरनी प्रार्थना  आहे … आनी ते सर्व मला न सांगताच देतात . 
                "  ओम साई राम " 

              तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लोग मधे . मि मधे आजारी पडल्याने न्यू ईयर चा संकल्प टूटला रोज ब्लोग लिहीन्याचा  . पन लवकर बरी होऊन डेली ब्लोग लिहीन्याचा प्रयत्न नक्की करेन . 
     

              तर नेहमिप्रमाने आजचा  ब्लोग कसा वाटला हे नाही विचारनार कारन हा ब्लोग मि फक्त बाबांसाठी लिहीला आहे . आनी तुम्हालाही वाचुन  आपल्या आजी आजोबा ची आठवन नक्किच येईल ही खात्री आहे . 
  बाय बाय डीयर फ्रेंड्स  .  पुन्हा भेटूत . खुष रहा मस्त रहा . . .ब्लोग लिहा . . ब्लोग वाचा :) 


 / / / / / / / / / / / /;/ / / / / / / /;/ / / / / / / / / / // / / /
  








Wednesday, 2 January 2019

स्वप्न मनाचे गुलाम

मनी वसे ते स्वप्नी दिसे 
     जर दिवसभर रमलात फुलांच्या बागेत . 
       तर रात्री ऊडताल फूलपाखरांच्या रांगेत. 
कारन मनी वसे तेच स्वप्नी दिसे .  
       दिवसभर घेतलात डोक्याला ताप ,
             तर स्वप्नांनी होईल झोपेली मात 
             कारन मनी वसे तेच स्वप्नी दिसे
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

      सर्वांनी हे ऐकल असेलच . . कि जे मनी असत तेच अगदी स्वप्नी दिसत . आनी अनुभवल ही असेल   . मिही अनुभवल आजच . पन जरा  सुरवात जरा भयानक च झाली . होय कारन स्वप्नच तस पडल . एक भयानक चेहरा असलेली बाई , काळया दातावाली , केस अस्ताव्यस्त असलेली , काळपट सावली असलेली , अगदी छातीत धास्ती भरल अस हसन तीच . आनी चेहरा ईतका घानेरडा कि बघवनार नाही . कारन ती कुनी साधी बया नव्हती . ति होती त्या एकता कपुर च्या & टी व्ही वची डायन मधली ती ऊडनारी विचित्र बया . खि खी करनारी - ऊडनारी ते भयान रुप असलेली ती डाखिन च माझ्या स्वप्नात आली होती . कारन मि ते पाहुन झोपायला गेले होते न . अगदी तशीच आली स्वप्नात माझ्या अवती भवती सावली फिरताना दिसली . आनी तो हसन्याचा आवाज येताच मिडचकून ऊठले . मला अगदी धास्तीच  भरली होती . हो खुप घाबरली अर्धा तास ते विसरले नाही स्वप्न . जरा वेळ आवडती गानी ऐकली. मग जरा मनाचा विरंगुळा झाला .आनी त्या घान स्वप्नाचा विसर पडला . पन एवढ सहन करूस्तर का अशे स्वप्न पडून घ्यावेत .? होय खर आहे आपल्याच हातात असते स्वप्न कशे पाडावेत . जे आपल्या मनात विचार .स्वप्नही त्याचप्रमाने येतात . जस मला पडल पहील्यांदाच अस. हो कारन असल्या घान सिरीयल मि बघत नाही सहसा . पन इक गोष्ट कमाल आहे मि डाखीनिची अजुन इक डायन ची सीरीयल पाहते पन ती वेनीवाली कधी स्वप्नात नाही आली मला घाबरवायला  हो . स्टार प्लस ची" नजर " सर्वांना माहीत असेलच . त्या सीरीयल मधे तर डायन ,चुडेल वगेरे निराळया प्रकारच्या आत्मांचा भरमसाठ माराच आहे. पन त्याच्याल्या डाखिनी ची भिति नाही वाटली ईतकी  कारन त्या दिसायला सुंदर , मोडर्न हिरोईन सारख्या बघुन वाटत नाही डाखीनि असतिल .
   हेच तर  गुढ आहे यातल . स्वप्नात भितीदायक आनी टेंशन वाल्या गोष्टी च जास्त घाबरवतात .मि त्याच्याच दुसरया दिवशी एनिमेटेड मुव्ही पाहीला तर माझ्या स्वप्नात ऊडनारे मोर आनी फुलपाखर आले निसर्गरम्य परीसरात . कारन मि मन लाऊन पाहीला होता सीनेमा आनी तो आवडल्याने त्यातले सुंदर द्रूष्य माझ्या मनात ऊतरले होते . आनी अशे सिनेने बघताने मला नेहमी वाटत त्या मैजिकल दुनियेत जाता आल तर . ऊडनारी फ़ुलपाखर . एनिमेटेड सिनेम्यात अगदि मोहक डोळे भरुन टाकनारे द्रूष्य असतात .
  त्याच प्रकारे अजुन एक गोष्ट आहे . बहुतेक जन टेंशन मधे झोपल्यावर तान येईल असे स्वप्न पडतात . लहान मुलांना त्यांच्या ईच्छेप्रमाने हवे असलेल्या खेळन्याचे स्वप्न येतात. आनी छोटे मूल झोपेत बरचळतातही . त्यांना झोपेत जस दिसल प्रमाने ते हसतात घाबरतात हे सर्व
त्यांच्या  स्वप्न पडल्यावर अवलंबुन असत .म्हनजेच आपन झोपताना इक तर दिवसभराच्या घडामोडीचा फैशबैक होतो किव्वा त्या आपल्या चांगल्या किव्वा वाईट विचारांप्रमाने आपल्या स्वप्नात झळकुन आपल्या प्रश्नांची ऊत्तर आपल्याला देत असतात . मग जर साकारार्थी विचार असेल तर आपल्याला आपपल्या स्वप्नातुन साकारात्मक ऊत्तर मिळत . 
जर नाकारात्मक विचारांचा मारा करुन झोपलात तर उत्तरही नाकारार्थीच भेटनार . आनी खराब स्वप्न पडन  यामाग आपलेच विचार असतात . पन मग तेव्हा  ऊगी मग अंधश्रद्धेचे तर्क वितर्क लावत बसतो कि , हे अस स्वप्न पडल मग अस होनार भविष्यात. किव्वा कुठला चांगला वाईट संकेत मिळाला असे समज करतात . मलाही अशा तर्क वितर्क लावनारे भेटले आनी मि घाबरलेही तेव्हा . पन , 
        हे कितपत बरोबर आहे . हो जुने लोक आपल्या आधी जलमले त्यांना स्वप्नाचे संकेत माहीत असतीलही . त्यांनीही त्यांच्या आजी आजोबा ,पंजोबा यांचेकडन ऐकल असल . म्हनुन ते बोलन जस च्या तस आपल्या पिढीपर्यंत हयात राहील . पन माझ मत अस आहे . संकेत काहीही असेना . 70% स्वप्न कस पाडायच हे आपल्याच हातात असत . कारन  आपन वाईट स्वप्न पडल्यावर त्याचा अर्थ् किवा त्यावरन वाईट निष्कर्ष ठरवन्यापेक्षा ते नाकारार्थी पडनारच नाही याची खबरदारी घेतलेली जास्त सोयीस्कर . मला माझेवरन च अनुभव आला . मि कितीही लेट झोपु . झोपताना इक तरी आवडीच सौम्य अस गान ऐकुनच झोपायचे . आनी झोपताना देवाच नाव घेऊन झोपायचे . तेव्हा मला कधीही असल विद्रूप स्वप्न पड्ल नव्हत . मात्र एकता कपुर ची डाखिन मला चांगलीच नडली बुआ . ति घान सीरीयल बघुन मला त्यावर पेपर ही द्यायचा नव्हता एन मग का पहावि मी ? हेच आपल्यावर असत . ज्याप्रकारे आपन बघतो . किव्वा विचार असतात . स्वप्नही त्याचही इक रुप आहे
म्हनुन झोपताना इक तर आवडत गान ऐकुन झोपाव जर गाने ऐकन्याची आवड असल तर . किव्वा एखाद चांगल पुस्तक वाचुन झोपाव , यू टूब चे शौकिन नी चांगले व्हीडीओ बघावेत ज्यातुन मोटीवेशन मिळल.  त्या डाखिनी ने स्वप्नात मला घाबरवल्यापासन मि तर डेली अपडेट केल माझ्या रुटीग मधे कि झोपताना अशा सडक्या कल्पनांतुन ऊत्पंन्न झालेल्या विचित्र सिरीयल झोपताना अजीबात पाहायच्या नाही . झोपताना न पाहन्यापेक्षा ईतर वेळा ही टाळाव्यात . हेच योग्य . कारन ईतर हसवनारया , देवाच्या , ऐतिहासीक सिरीयल ची कमि थोडी आहे टी व्ही वर .
 :) इक स्वप्नानी बराच मोठा धडा शिकवला आपन कशातन ना कशातन म्हनजे प्रत्येक गोष्टीतुन  काहीतरी शिकत असतोच मग ते चांगल किव्वा वाईट पन शिकत तर नक्की असतो हे मात्र खरे ह :)












Tuesday, 1 January 2019

ऊत्साह नविन वर्षाचा

नविन वर्षाची सुरूवात . 
           भर  होओ सुखाची ,
                होऊ दया वाढ ऊत्साहात . 



" नविन वर्ष " हे प्रत्येक वर्षाला येते आनी पुढल्या वर्षाला जुने होते . पन मात्र या नविन वर्षा चा ऊत्साह मात्र सर्वांना असतोच . मग ढीगभर हैपी न्यू यियर चे मेसेज असो किव्वा  मित्र मैत्रीनींसोबत केक कट करन ,कुनी  नविन वर्षाच स्वागत करत  असत तर कुनी  जुन्या वर्षाला बाय बाय करत 31 ची पार्टी . प्रत्येक जन आपल्या परीने हा दिवस कसा साजरा करायचा याचे नियोजन करत असतो . .  ,

नविन वर्ष आल कि आले न्यू ईअर रिजोलुशन . म्हनजेच इक नवा संकल्प .जो बहुधा प्रत्येक जन करतो आनी दोन दिवसातच तोडतो . कुनी एक महीनाभर त्याच पालन करतात . तर कुनी संकल्प केलेला आहे हेच विसरतो ;) तो फौलो करन दुरच . काही लोक संकल्प करुन तो नविन वर्षात आमलात आनतही असतील . सर्वच तोडतात असे नाही . 

मि मात्र संकल्प 50% फौलो करनार्यांमधे येते . मग माझ्या आवडत्या विषयांवर संकल्प केला असेल तर मग 50% वर्न 65% वर संकल्प कार्यात  येतो . मात्र तो संकल्प किती कालावधी पर्यंत कार्यरत राहील हे निच्छित नसत . 

मि तर काही असेही निगेटीव  लोक पाहीलेत . जे नविन वर्षासाठी करनार्या संकल्पासाठी असे मत ठेवतात की ,  " काय . .   किति  तरी वर्ष आली आनी गेली . .आत्तापर्यंत तर किती संकल्प करायला हवे होते . तेव्हा नाही केले आनी आता काय करायच . ?  असे मत असना रे लोक खरच किती दुर्बल विचारांचे प्राणी असावेत !  . . . .कारन जि गोष्ट आपन आगोदर नाही केली ती काय आत्ताही नाही करायची . ? का कधीच नाही करायची . ? बस मि त्या व्यक्तिच बोलन ऐकल्यावर त्या क्षणि मनात इक संकल्प केला कि , अशा लोकांपासन दुर राहायच , आनी असे आपले पाय खेचनारे लोक लगेच कट करायचे आयुष्यातुन . कारन अश्या टाईप च्या लोकांची संगत फक्त अंधारात नेते आपल्याला , आत्मविश्वासाच खच्चिकरन करनारर्या लोकांचे निगेटीव विचारही आपन न ऐकलेले बरे . 

आज नविन वर्षाची सुरूवात माझ्यासाठी दिवाळीच  पर्व पुन्हा एकदा घेऊन आली . मजा आली पुन्हा ती दिवाळी ची  अभ्यंगस्नानाची पहाट अनुभवून . अगदी ताजेतवाने वाटले नविन वर्षाचा नविन दिवस अगदीच खास बनला . कारन नविन वर्षाला सकाळी ऊठन्याचा  संकल्प केला होता ,पन भयंकर ठंडीत जागच आली नाही. पहाटे साडे चार चा गजर तर  लावला पन कडाक्याच्या ठंडीत ऊठावसच नाही वाटले . पन संकल्प तर केला होता लवकर ऊठन्याचा ,व्यायाम करन्याचा . म्हनुन मग हा नविन वर्षाचा पहीला दिवस मला स्वतासाठी काहीतरी स्पेशल करुन खास घालवायचा होता . पन ठरवलेला रिजोलुशन तर पुर्न झाला नाही म्हनुन मुड काही घालवायचा नव्हता कारन नविन वर्षाची सुरवातही होती.  ते बोलतात ना , नविन वर्षाची सुरवात जशी कराल . तेच वर्षभर घडते . अस लहान पना पासुन ऐकत आले . मग जो ऊशीरा ऊठेल तो वर्षभर ऊशिरा ऊठल . . अस काहीतरी असेल माननारयाच मत .  पन काही का असेना . हे खर असो वा नसो . रीस्क नको म्हनुन आजवर फ़ौलो करत आले हे . म्हनुन मलाही नविन वर्षाचा पहीला दिवस चांगला , माझे आवडते कामि करुन घालवायचा होता . 

मग मेमोरेबल डे किव्वा छान सुरुवात साठी   मग काय कराव आज स्पेेशल असा विचार  झोपल्या झोपल्या मऊ ब्लांकेट मधन मनात चालु होता .  केक आनावा कि आईसक्रिम? 

आपल्या फ़ेवरेट गान्यांनी मूड कूल बनवावा असे अनेक तर्क चालु होतेच . 

पन रुकरुकही लागली कि यार आज सकाळी  ऊठायला हव होत ,व्यायाम करायला हवे होते . आनी मस्त सकाळ सकाळ आंघोळ करुन देवपुजा करुन काय मस्त दिवसाची सुरुवात झाली असती . ? असे अनेक विचारांचे फुलपाखर मना भोवताली ऊडत   होते . पन तेवढयात जादुची छडी छुु मंंतर छुु फिरवरल्यागत  ट्यूब पेटली . आनी इक  समाधानकारक  अस एक ऊत्तर सुचल यावर  . कि , अजुन कूठ दिवस संपला आहे नविन वर्षाची सुरुवात आपन ठरवली तशी नाही झाली म्हनुन दिवस थोडीच संपला . अजुन अख्खा दिवस आहे . असे मनाच सांत्वन घालनारे समाधानकारक ऊत्तर भेटल्यावर आपल्या हातातुन गेलेला तो पहाटेचा टाईम विसरुन आनी सोबत असलेला सकाळी 7 वाजता चा कंम्फर्ट टाईम हाती घेऊन,  वर्षाचा  दिवस हा ठरवलेल्या संक्ल्पाप्रमाने द सुरु केला. म्हनजे व्यायामाने . नेहमीचे 10 सूर्यनमस्कार आनी थोडे योगा आसन . नंतर अंभ्यंगस्नान  ,तेही अगदि दिवाळी सारख च ऊटने लाऊन , आनी तिळ तेलाची मस्त मालीश करुन . कारन त्याने शरीरात रक्तभिसरन चांगल होत . म्हनुन मालीश प्रत्येक संडे ला करन्याचा माझा नियम आहे  . आनी याने   असे तरतरीत फ्रेश वाटले मला नविन वर्षाच्या पहील्या दिवशी . त्याच गमतीशीर दुसर  कारन म्हनजे  , मि इवढया कडाक्याच्या ठंडीत अर्धा तास आंघोळ केली होती . ;) बापरे . भयानक ठंडी होती . आनी असा ठंडीत अभ्यंगस्नानाचा अनुभव हा प्रामुख्याने दिपावलीत च येतो . म्हनुन तर म्हनल मि सुरवातिला कि नविन वर्षाची सुरुवात हे दिपावलीच पर्व पुन्हा घेऊन आली माझेसाठी . ते म्हनजे हे असे . 
तस तर मला दिवसाची सुरूवात माझ्या साठी दिवसाची मस्त आशी सुरुवात म्हनजे माझे  साई बाबा आनी गनु जी यांची पुजा ,आरती होने आहे . कारन जेव्हा कधी माझ देवपुजा , देवाच वाचन होत नाही तो दिवस मला चुकल्या चुकल्या सारख वाटत . आनी चिडचिड़ ही होते . म्हनुनच मि आगोदर पुजा पुर्न केली . नंतर योगा आटोपला  ,त्यानंतर माझे आवडत्या कामानुसार पुर्न दिवस घालवला . जसे कि , हेल्थ - रेसिपि चे पुस्तक वाचली , माझे आवडते प्रोग्राम बघितले , कार्टून व्हिडीयो बनवला यू ट्यूब साठी , इक स्केच काढल . कारन मला लहानपनापासुन चित्र आवडतात . मि बोर झाल्यावर चित्र काढते . आवडते म्यूजिक ऐकते . ज्याने माझा मुड छान राहतो . त्या दिवशीही असेच केले . आनी अजुन इक आवडत काम केल . दोन आर्टीकल लिहीले . इक कविता केली . कविता ही  मला नेहमी चांगला मुड असताना सुचते , किव्वा एखादया विषयावर ब्लोगिंग करताना सुचते . 
असा च माझा नविन वर्षाचा पूर्ण दिवस माझ्या आवडत्या गोष्टि करन्यात गेला . म्हनजे ठरवल्याप्रमाने . लवकर जरी नाही ऊठले तरी बाकी ऊरलेला दिवस आवडत्या गोष्टी करुन घालवला . ज्यातन मला नेहमी आनंद भेटतो . 

यातुन मात्र एक गोष्ट ऊमजली . स्वतावर नियम लादन्यापेक्षा त्याच आवडीप्रमाने नियोजन केल टाईम टेबल ठेवल कि ठरवलेल्या गोष्टी व्यवस्तित पार पडतात . 

          या सर्व माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत .म्हनुन त्या  मि केल्या . जेने करुन माझा दिवस आनंदी गेला . बाकी जन त्यांचे आवडीप्रमानि गोष्टी करुन स्वताहाला पैपर करु शकतात . मि जे केले ति माझि आवड होती . आनी मि तसा दिवस घालवला तेही ठरवलेला संकल्प अपुरा न ठेवता  . यातन इक गोष्ट मात्र पटली की आपला दिवस कसा घालवायचा हे फक्त आपल्या हातात आहे . आनी  हे मात्र खरच आहे कि आपन च  स्वताहाला खुश ठेऊ शकतो , पन जर ठरवल तर . कारन असे बोलून तर मिही कितितरी गोष्टी आजवर ठेवल्या होत्या  . पन पूर्ण त्याच झाल्या ज्या मला मनापासुन करन्याची आवड होती . इच्छा होती . 
कारन मि लेट ऊठुन रिजोलुशन तुटला म्हनुन पूर्ण दिवस जर तसाच रोजसारखा घालवला असता तर नेहमी वाटल असत माझेच्यानी नाही होत पुर्न . काय ठरवलेल . मग कसला आलाय रिजोलुशन आनी कसल काय ,मला नाही जमनार असे इक मत झाल असत माझ नेहमी .  म्हनुन न झालेल काम पुन्हा कसे होईल हे बघने जाकारन मि लेट ऊठुन रिजोलुशन तुटला म्हनुन फुल डे तसाच रोजसारखा घालवला असता तर नेहमी वाटल असत माझेच्यानी नाही होत पुर्न . म्हनुन हा न झालेल काम पुन्हा कसे होईल हे बघने जास्त चांगल  . हेे जाानवल आज . याने गिल्ट नावाच्या निराशेचा जन्म नाही होत 

 आपन आजवर मानत आलो असल , एकल असल कि नविन वर्षाची सुरुवात चांगली करावी म्हनजे पुर्न वर्ष छान जाते . सुरवातीला कसली  नाट लागली कि वर्षभर लागते हे मि इक दोन बायकांकडंन ऐकलेल . म्हनुन माझे  ईथून मागचे नव वर्ष रीजोलुशन टोडन्यासाठीच प्रसीद्ध आहेत . 

कारन ठरवल्याप्रमाने नाही झाल कि मि समजायचे , अरे पहील्याच दिवशी नाट लागली म्हनुन आता नाहीच होनार काम पूर्ण म्हनुन करायच्या आगोदरच हातच काम बंद केलेल आठवत मला . हे लहानपनी मि लक्ष देऊन त्या हुशार बायकांचे अति हुशार असे तर्क ऐकन्याचे परीनाम . 

पन आज मात्र तस नाही झाल . याच कारन हेच कि मि ते नाही होऊ दिल . संकल्प पाळने किव्वा तोडने हे आपल्या हातात आहे . वेळ गेली म्हनुन निराश होन्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करुन हवे ते कसे मिळवता येईल हा विचार करायला हवा .जे माझे प्रीय आजोबा आज्जी मला लहानपनापासुज सांगत आले आहे . आनी  आज मि ते अनुभवलही आनी एक छान समाधानही मनाप्रमाने घडल्याचे :) 

ब्लोग कसा वाटला . ? नविन वर्षा साठी ब्लोग ही नविन बनवला होता मि काही खास गोष्टीवर . माझा दुसराही ब्लोग आहे . पन तो मोठा असतो. खोलवर मुद्देशिर .  हा मि रोजनिशी टाईप बनवला . रोजच्या काही आपल्या मतानुसार गोष्टी आनी आपले अनुभव . 
//////// ////// /////////////  
कसा वाटला आजचा नविन वर्षाचा नविन ब्लोग आनी ही रीजोलुशन ची पहीली पोस्ट . .? नक्की सांगा . आवडला तर ,
 तर नक्कि शेअर करा . बाय गुड नाईट . आज नाहीतर ऊद्या लेट होईल ऊठायला  पुन्हा तुटेल माझा रिजोलुशन :)  
 . . . .पन मला  नाही वाटत असे  होईल 
  कारन माझ्या ईच्छाची चावी  माझेकडच आहे आता.  हे अनुभवल आज .काही स्वता तर काही माझ्या आज्जी आजोबांच्या शिकवलेल्या विचारातुन  :) 
   ///////////      /////////////     ////////////      //////////////
        
               पुन्हा भेटू पुढच्या ब्लोग मधे . 
          नविन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा :) 
//////////// 
////// ///////////////       ///////////      //////



आदित्य ह्रिदय स्तोत्र

    विनियोग ॐ अस्य आदित्यह्रदय स्तोत्रस्य अगस्त्यऋषि: अनुष्टुप्छन्दः आदित्यह्रदयभूतो भगवान् ब्रह्मा देवता निरस्ताशेषविघ्नतया ब्रह्माविद्यासि...